UP News
महातंत्र ऑनलाईन डेस्क : उत्तर प्रदेशमधुन विद्यार्थी अत्याचाराची एक घटना समोर आली आहे. लखनौ येथील एका शाळेत शिक्षिकेने एका विद्यार्थ्याला बेदम मारहाण केली आहे. मारहाण झालेला विद्यार्थी हा बहुजन समाज पक्षाचे (BSP) नेते, माजी मंत्री सतीश मिश्रा यांचा नातू असल्याचे समोर आले आहे. याप्रकरणी संबधित शिक्षिकेवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. संगीता सहाय असे गुन्हा दाखल झालेल्या शिक्षिकेच नाव असुन त्यांनी टिफिन ठेवल्याच्या कारणावरून बेदम मारहाण केल्याची माहिती समोर आहे. (UP News)
UP News : शाळेच्या मुख्याध्यापकांकडून शिक्षिकेवर कोणतीही कारवाई नाही
माहीतीनुसार बसपा नेते सतीश मिश्रा यांच्या मुलीच्या मुलाला पीटी शिक्षिकेकडून मारहाण करण्यात आली आहे. या प्रकारानंतर संबधित शिक्षिकेविरोधात शाळेत तक्रार दाखल करण्यात आली. पण तक्रारी करूनही शाळेच्या मुख्याध्यापकांनी शिक्षिकेवर कोणतीही कारवाई केलेली नाही. यानंतर सतीश मिश्रा यांचे जावई परेश मिश्रा (उच्च न्यायालयाचे वकील) यांनी गौतमपल्ली पोलीस ठाण्यात शिक्षिकेविरुद्ध एफआयआर दाखल केला आहे. पोलिसात नोंदवलेल्या गुन्ह्यानुसार, परेश मिश्रा यांनी सांगितले की, त्यांचा मुलगा लखनऊच्या हजरतगंजमधील लामार्टिनियर बॉईज स्कूलमध्ये पाचवीत शिकतो. त्यांनी आरोप केला आहे की आपल्या मुलाला पीटी शिक्षिका संगीता सहाय यांनी टिफीन घेण्याच्या कृतीवरुन मारहाण केली. धक्कादायक म्हणजे शाळा प्रशासनाकडून कोणतीही कारवाई करण्यात अपयश आले. कोर्टात असताना मारहाण झाल्याची बातमी मिळाल्याचेही त्यांनी सांगितले. त्यांनी तात्काळ आपल्या मुलाला शाळेत घेऊन मुख्याध्यापकांची भेट घेतल्याचे सांगितले. याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला असून पोलिसांनी तपास सुरू केला आहे.
कोर्टात असताना माझ्या मुलाला मारहाण…
परेश मिश्रा यांनी सांगितले की, “मी कोर्टात असताना माझ्या मुलाला मारहाण झाल्याचे समजले. त्यानंतर तात्काळ आपल्या मुलाला शाळेत घेऊन मुख्याध्यापकांची भेट घेतली. मी मुख्याध्यापकांना भेटल्यावर आपल्या मुलावर ओढवलेला प्रसंग सांगितला. संबधित शिक्षिकेवर कारवाई करण्याची मागणी केली. पण मुख्याध्यापकांनी मुलाचे काय झाले याची पर्वा न करता मुलाला शाळेत पाठवण्यास सांगितले. मुख्याध्यापकांच्या वागणुकीनंतर ते हताश होऊन घरी परतले. पुढे बोलताना ते म्हणाले की, माझा मुलगा या मारहाणीनंतर भेदरला आहे. घटनेमुळे माझ्या मुलाची मानसिक आणि शारीरिक हानी झाली आहे. तो घाबरत असल्याने शाळेत जाण्यासही नकार देत आहे.
हेही वाचा