मुंबई : बाप्पासाठी चक्क ‘वंदे भारत’ धावतेय | महातंत्र
सुरेखा चोपडे, मुंबई

आपल्या गणरायाची सजावट सर्वापेक्षा वेगळी असण्यावर प्रत्येकाचा भर असतो. सांताक्रुझच्या एका गणेश भक्ताने यंदा चक्क वंदे भारत एक्सप्रेसचा देखावा तयार केला आहे. या एक्सप्रेसमध्ये चार भाविकांना बसून बाप्पाचे दर्शन आणि आरती करता येणार आहे. तर स्वत: बाप्पा वंदे भारत एक्सप्रेसचे सारथी आहेत.

सार्वजनिक गणेशोत्सव मंडळांसह घरगुती गणपतीकरिता देखील विविध देखावे तयार केले जातात. सांताक्रुझच्या अयोध्या इमारतीमधील रहिवासी दिपक लहुजीभाई मकवाना यांच्या घरी गेल्या ३२ वर्षापासून पाच दिवस गणराय विराजमान होतात. दरवर्षी मेक इन इंडिय़ा अंतर्गत घडलेल्या महत्वपूर्ण गोष्टींचा देखावा दिपक उभारतात. दिपक हे स्वत: इंटेरियल डिझाइनर आहेत.

यंदाच्या गणेशोत्सवाकरिता त्यांनी चक्क केसरी रंगातील वंदे भारत एक्सप्रेस तयार केली आहे. प्लायवूड, एमडीएफ, प्लास्टीक आणि मेटलचा वापर करीत १५ बाय ६ फूट लांबीची आणि ६ फूट उंचीची वंदे भारत तयार केली आहे. या एक्सप्रेसच्या ड्रायव्हर सीटवर गणराय विराजमान होणार आहेत. तर चार भाविक एक्सप्रेसमध्ये बसून गणरायाची आरती आणि दर्शन करु शकतील. याकरिता सीएसएमटी स्थानकाचा लूक तयार करुन एक्सप्रेस उभी केली आहे.

या कामात दिपक यांना त्यांच्या पत्नी धारीनीसह दिया, खुशी, योम, प्रथम, शुभ आणि प्रथा या त्यांच्या मुलांची देखील मोलाची साथ मिळाली आहे.याआधी चंद्रयान टू,बांद्रा-वरळी सी लिंक,कोविड लस, चिनाबचा रेल ब्रीज,अयोध्या राम मंदिर आणि स्टॅच्यू ऑफ युनिटीचा देखावा उभारला होता.

हेही वाचलंत का?

Information Source / Image Credits

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *