पुणे10 तासांपूर्वी
- कॉपी लिंक
पुणे शहर व ग्रामिण भागात शिवप्रतिष्ठान संस्थेने मनोहर कुलकर्णी उर्फ संभाजी भिडे यांचे विविध कार्यक्रम आयोजीत केल्याची माहिती सोशल मिडीयाद्वारे निदर्शनास आली आहे. पुण्यात मांजरी व उरळी देवाची या ठिकाणी त्यांचे कार्यक्रम, व्याख्यान, बैठका घेणार आहेत. त्याला आमचा विरोध आहे. त्यामुळे पोलिसांनी या कार्यक्रमाच्या परवानग्या नाकाराव्यात अशी मागणी विविध पक्ष संघटनांनी गुरवारी पत्रकार परिषद घेऊन केली आहे. पुणे शहर व ग्रामिण पोलीसांनी याबाबत लेखी स्वरुपात या विविध कार्यक्रमाची परवानगी नाकारावी अन्यथा आम्हाला आंदोलन करावे लागेल, असा इशारा संस्थांनी दिला आहे.
वंचित बहुजन आघाडीचे पदाधिकारी गौरव जाधव आणि भीम आर्मीचे दत्ता पोळ म्हणाले, वास्तविक संभाजी भिडे या व्यक्तीने नेहमीच महापूरूपांबद्दल अत्यंत वादग्रस्त आणि अपमानजनक विधाने वेळोवेळी केली आहेत. देशाचा झेंडा, राजगित, स्वातंत्र्य या विषयी सुद्धा जाणिवपूर्वक देश विद्यातक वक्तव्य केली आहे. महिलांचा अवमान होईल अशी विधाने सुद्धा वारंवार केली आहेत.
यामुळे समाजात असंतोष असुन तमाम भारतीयांच्या भावना या व्यक्तीने दुखाविल्या आहेत. त्यामुळे अशा देश विरोधी व जातीयवादी व्यक्त्तीला कार्यक्रम घेण्यापासून रोखणे गरजेचे आहे. अनेकवेळा वादग्रस्त विधाने करून चर्चेत राहण्याचा केविलवाणा प्रयत्न या उतारवयात भिडे करत आहे. महिलांना समाजात कमी लेखून तसेच जातीय तेढ निर्माण करणारे वक्तव्य करून ते सामाजिक शांतता धोक्यात आणत आहे. त्यामुळे पोलिसांनी त्यांचे कार्यक्रम रोखावे अन्यथा याबाबत आम्ही आमच्या पद्धतीने आंदोलन करून निषेध व्यक्त करू असा इशारा यावेळी देण्यात आला आहे.