VIDEO: स्टेजवरून खड्ड्यात पडला शकीराचा एक्स बॉयफ्रेंड, ट्रोलर्स म्हणतात, Cheat केल्याची शिक्षा मिळाली!

Viral Video : तुम्ही सोशल मीडियावर आज कोणता व्हिडीओ पाहिला? जेवणाचा? खेळाचा की एखाद्या इन्फ्लूएन्सरचा? सध्या एक असा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे जो पाहून एकतर तुम्ही पोट धरून हसाल किंवा मग, ‘अरेच्चा! पकडा त्याला… ‘ असंच म्हणाल. कारण, या व्हिडीओमध्ये भर कार्यक्रमात एक खेळाडू धाडकन खड्ड्यात पडताना दिसत आहे. 

का पाहिला जातोय हा व्हिडीओ?

किंग्स लीग अमेरिका या कार्यक्रमासाठी गेरार्ड पिकनं हजेरी लावली होती. त्याचवेळी एक असा प्रसंग घडला ज्यामुळं कार्यक्रमाला आलेल्या अनेकांना हसू आलं, तर काहींच्या चेहऱ्यावरील हावभाव क्षणात बदलले. 

गेरार्ड पिक माईकवर बोलत स्टेजच्या काठापाशी चालत आला. तिथं एक फुटबॉलप्रेमी त्याची जर्सी घेऊनच उभा होता. प्रेक्षकांमध्ये असणाऱ्या त्या चाहत्याच्या दिशेनं गेरार्ड आला आणि त्याचा स्टेज तिथं संपला याची जाणीवच झाली नाही. गेरार्डनं एक पाऊल टाकलं आणि तो धाडकन तिथं असणाऱ्या एका खड्डावजा जागेत पडला. बस्स, मग काय? तिथं एकच पळापळ झाली. 

Related News

एका क्षणात गेरार्डचा हा व्हिडीओ व्हायरल झाला आणि त्याची ही कृती पाहून तिथं असणाऱ्या काही प्रेक्षकांमध्ये एकच हशा पिकला. तर, काही चाहत्यांनी थेट गेरार्डच्या खासगी आयुष्यावरच टीका केली. जगप्रसिद्ध गायिका शकिरा आणि गेरार्ड कधीकाळी एकमेकांच्या प्रेमात होते. पण, या नात्यात गेरार्डनं तिची फसवणूक केली. बस्स, याचाच उल्लेख करत हा त्याच्या कर्माचीच फळं भोगतोय असं म्हणत नेटकऱ्यांनी त्याची खिल्ली उडवण्यास सुरुवात केली. गेरार्ड पडला खरा, पण त्याच्या या पडण्यामुळं त्याचं खासगी आयुष्य पुन्हा प्रकाशझोतात आलं आणि एका क्षणात पुन्हा शकिराला फसवणंच तुला महागात पडलं, असंही अनेकजण म्हणू लागले. तुम्ही यापैकी कोणत्या गटात? 

 

 Information Source / Image Credits

Related News

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *