Video: मुंबईच्या ट्रॅफिकमध्ये फसलेल्या रिक्षा चालकाने दाखवले भन्नाट टॅलेंट, परफॉर्मन्स एकदा पाहाच!

Mumbai Traffic News:  मुंबईतील वाहतुक कोंडी हा विषय नेहमीच चर्चेत असतो. सकाळी व संध्याकाळच्या वेळेस होणारी वाहतुक कोंडीमुळं यामुळं नागरिकांना मोठा मनस्पाप सहन करावा लागतो. मात्र गेल्या काही दिवसांपासून मुंबईच्या ट्रॅफिकमधील एक व्हिडिओ व्हायरल होतोय. स्टॅंड अप कॉमेडियन समय रैना याने हा व्हिडिओ एक्स म्हणजेच ट्विटरवर शेअर केला आहे. या व्हिडिओ आता सोशल मीडियावर तुफान व्हायरल होतोय. 

व्हायरल झालेल्या व्हिडिओत दिसत आहे की, एक ऑटो ड्रायव्हर अंधेरी ट्रॅफिक सिग्नलवर अडकला आहे. मात्र, ट्रॅफिक सिग्नलवरच त्याने कराओकेचा स्पॉट तयार केला आहे. वाहतुक कोंडीत सगळे फसलेले असताना तो मात्र मस्त गाण गात आपलं कौशल्य दाखवत आहे. एक्सवर शेअर केलेल्या व्हिडिओवर समय रैना याने कॅप्शन दिलं आहे. असं वाटतंच नाहीये की मी अंधेरी सिग्नलवर अडकलोय. किती प्रेमळ आणि चांगला मुलगा आहे. शेवटपर्यंत हा व्हिडिओ पाहा, असं समय रैना याने म्हटलं आहे. 

व्हिडिओच्या सुरुवातीला एक रिक्षा चालक दिसत आहे. ज्याच्या रिक्षात एक माइक आणि एक स्पीकर लावलेला दिसत आहे. तो ट्रॅफिकमध्ये अडकलेल्या लोकांचे गाणे गावून मनोरंजन करताना दिसत आहे. जेव्हा त्याचे गाणं गावून संपते तेव्हा तो समय रैनासोबत बोलतानाही दिसत आहे. ट्रॅफिकमध्ये असताना खूप कंटाळा येतो त्यामुळं मी गाणं गाऊन सगळ्यांचे मनोरंजन करतो. रिक्षा चालकाच्या या उत्तरावर समय रैनाही टाळ्या वाजवून त्याचं कौतुक करताना दिसत आहे. 

Related News

31 ऑक्टोबर रोजी ट्विटवरवर ही पोस्ट शेअर करण्यात आली आहे. ही पोस्ट शेअर करण्यात आल्यानंतर त्यावर 78 हजारांहून अधिकवेळा पाहिलं गेलं आहे. तर, या व्हिडिओला 2 हजारांहून अधिक लाइक्स आणि कमेंट मिळत आहेत. रिक्षा चालकाच्या गाण्याचे युजर्सही कौतुक करत आहेत. एका युजरने म्हटलं आहे की, हे खूपच चांगलं आहे. दुसऱ्याने कमेंट करत म्हटलं आहे की, बेंगळुरुतील रिक्षा चालक स्वॅग आणि कुलनेस या स्तरापर्यंत कधीच पोहोचणार नाही. तिसऱ्याने पोस्टवर कमेंट करत म्हटलं आहे की, अरे व्वा किती पॉझिटिव्ह मुलगा आहे. तुम्हाला देखील हा व्हिडिओ आवडला का, आम्हालाही कमेंट करुन तुमच्या प्रतिक्रिया कळवा.Information Source / Image Credits

Related News

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *