विजय वडेट्टीवार ‘यू टर्न’ विरोधी पक्षनेते; आशिष देशमुखांची खोचक टीका

नागपूर : मंत्री छगन भुजबळ (Chhagan Bhujbal) टोकाची भूमिका घेत आहेत, त्यामुळे यापुढे मी भुजबळांच्या कोणत्याही मंचावर जाणार नसल्याचे म्हणत विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार (Vijay Wadettiwar) यांनी आपली भूमिका स्पष्ट केली आहे. त्यांच्या याच भूमिकेवरून भाजप नेते आशिष देशमुख (Ashish Deshmukh) यांनी त्यांच्यावर जोरदार हल्लाबोल करत खोचक शब्दात टीका केली आहे. “विजय वडेट्टीवार हे यू टर्न विरोधी पक्षनेते असून, त्यांची ओबीसींबद्दलची भूमिकाही सुद्धा संशयास्पद असल्याचे,” देशमुख म्हणाले आहेत. 

दरम्यान याबाबत बोलतांना आशिष देशमुख म्हणाले की, “अंबड येथील ओबीसी सभेत 17 नोव्हेंबरला विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार यांनी ओबीसींबद्दलची आपली भूमिका मांडली होती. या सभेला पक्षाच्या वतीने मी देखील उपस्थित होतो. मात्र, दोन दिवस उलटत नाही तो वडेट्टीवार यांनी यावरून यू टर्न घेतलाय. त्यामुळे त्यांची ओबीसींबद्दलची भूमिका संशयास्पद आहे. वडेट्टीवार नेहमी संभ्रम अवस्थेत आपल्या भूमिका मांडत असतात. या महाराष्ट्राला विरोधी पक्षनेत्याची एक मोठी परंपरा आहे. पण आजपर्यंतच्या इतिहासात वडेट्टीवार यांच्यासारखा संभ्रम अवस्थेत असणारा आणि यू टर्न घेणारा विरोधी पक्षनेता या महाराष्ट्राने पाहिला नाही. त्यांची, बदलती भूमिका ओबीसी बांधवांच्या मनामध्ये संशय निर्माण करणारी असल्याचे देखील देशमुख म्हणाले. 

Related News

भाजपची भूमिकाही सांगितली…

ओबीसी समाजाच्या आरक्षणाला कोणताही धक्का न लावता मराठा समाजाला आरक्षण देण्याची भूमिका भाजपची आहे. ओबीसी कोट्याच्या व्यतिरिक्त हे आरक्षण मिळाले पाहिजे. यासाठी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि संपूर्ण सरकार कटीबद्धतेने काम करत आहे. त्यामुळे, यात नक्कीच यश मिळणार आहे. मात्र, असे असताना महाराष्ट्राच्या सामाजिक सलोख्यामध्ये कमतरता आली नको पाहिजे, गावागावात गुण्यागोविंदाने ओबीसी आणि मराठा समाज एकत्रित राहिले पाहिजे असेही देशमुख म्हणाले आहेत. 

नेमकं काय म्हणाले होते वडेट्टीवार? 

“ज्याप्रकारे छगन भुजबळ टोकाची भूमिका घेत आहेत ते पाहता त्यामुळे मी यापुढे भुजबळांच्या कोणत्याही मंचावर जाणार नसल्याचे मत विरोधी पक्ष नेते विजय वडेट्टीवार यांनी व्यक्त केले आहे. भुजबळांचा विरोध किंवा समर्थनाचा प्रश्न नाही, भूमिका टोकाची घेतल्याने विरोध आहे. भुजबळांच्या भूमिकेमुळे समाजात तेढ वाढत आहे. त्याला आमचा विरोध आहे. महत्वाचं म्हणजे भुजबळांचं मत म्हणजे समाजाची भूमिका होत नाही असंही वडेट्टीवार म्हणाले. 

इतर महत्वाच्या बातम्या: 

वडेट्टीवार म्हणाले, भुजबळांच्या कोणत्याच कार्यक्रमाला जाणार नाही, भुजबळ म्हणतात, एकटा तर एकटा लढणार!

Information Source / Image Credits

Related News

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *