अमरावतीमध्ये सुपारी देऊन विलास कोठेचा खून: ४० हजार रुपयांची सुपारी देणाऱ्यासह चौघांना पोलिसांनी केली अटक

अमरावती27 मिनिटांपूर्वी

  • कॉपी लिंक

पिंपळखुटा येथील विलास रंगराव कोठे (४४) नामक व्यक्ती महिनाभरापासून बेपत्ता होता. दरम्यान, सहा दिवसांपूर्वी कोठेचा खून झाल्याची कुणकुण कानावर येताच पोलिसांनी गावालगतच्या जंगलातील जमिनीतून हाडाचा सांगाडा बाहेर काढला. हा सांगाडा विलास कोठेंचा असल्याच्या निष्कर्षाप्रत पोहोचून पोलिसांनी चार आरोपींना अटक केली आहे. गावातील एकाने तिघांना ४० हजार रुपयांत विलास कोठेंच्या खुनाची सुपारी दिल्याचे आज (दि. ४) समोर आल्याचे फ्रेजरपुरा पोलिसांनी सांगितले आहे.

Related News

सुमित मधुकर कावरे, जगदिश चिंतामन वाकडे, सतीष ऊर्फ अविनाश सुरेशराव धर्मे आणि सुरेन्द्रकुमार कुसूमाकर ठोसर (सर्व रा. पिंपळखुटा, अमरावती) असे अटक आरोपींची नावे आहेत. सुरेन्द्रकुमार ठोसर आणि विलास कोठे यांच्यात मागील काही दिवसांपासून सातत्याने वाद व्हायचे, यातून कोठेने ठोसरला जीवे मारण्याची धमकीसुध्दा दिली होती. दुसरीकडे जगदिश वाकडेच्या परिचित मुलीवर कोठेची वाकडी नजर होती. त्यामुळे वाकडेसुध्दा कोठेचा वचपा काढण्याच्या मानसिकतेत होता. ही बाब ठोसरला माहीत होती. त्यामुळे ठोसरने कोठेचा खून करण्यासाठी वाकडे, कावरे आणि धर्मे यांना ४० हजार रुपयात कोठेच्या खूनाची सुपारी दिली. त्यामुळेच ३ ऑगस्टला वाकडे, कावरे व धर्मे या तिघांनी विलास कोठेला सोबत घेतले व कटूले‎आणण्यासाठी आपण जंगलात जावू, असे म्हणून सोबत नेले. त्याच ठिकाणी तिघांनी‎गळा आवळून त्याचा खून केला. तसेच ४ ऑगस्टला खड्डा करुन मृतदेह पुरला,‎याचवेळी दुर्गंधी येवू नये म्हणून त्यांनी त्यावर मीठसुध्दा टाकले होते.

दरम्यान हाडाचा‎ सांगाडा मिळाल्यानंतर कपड्याच्या आधारे पोलिसांनी हा मृतदेह विलास कोठेंचा‎ असल्याबाबत निष्कर्ष गाठला आहे. तसेच डिएनए नमुने तपासणीसाठी पाठवले आहे.‎ही कारवाई फ्रेजरपुराचे ठाणेदार गोरखनाथ जाधव, एपीआय रविन्द्र सहारे, पीएसआय‎आकाश वाठोरे व पथकाने केली आहे.‎

Information Source / Image Credits

Related News

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *