Virat Kohli ICC Finals : विराट कोहली बनला ICC फायनलमध्ये सर्वाधिक धावा करणारा फलंदाज | महातंत्र

महातंत्र ऑनलाईन डेस्क : Virat Kohli ICC Finals : भारत आणि ऑस्ट्रेलिया यांच्यात वनडे वर्ल्डकपचा अंतिम सामना अहमदाबादच्या नरेंद्र मोदी स्टेडियमवर खेळला जात आहे. या लढतीत विराट कोहलीने नवा इतिहास रचला आहे. तो आयसीसी फायनलमध्ये सर्वाधिक धावा करणारा खेळाडू बनला आहे.

ICC फायनलमध्ये सर्वाधिक धावा (Virat Kohli ICC Finals)

अंतिम सामन्यात विराट कोहली 63 चेंडूत 4 चौकारांच्या मदतीने 54 धावा करून पॅव्हेलियनमध्ये परतला. 29व्या षटकाच्या तिसऱ्या चेंडूवर पॅट कमिन्सने त्याला त्रिफळाचीत केले. पण या दरम्यान, 41 धावा करताच त्याने ICC फायनलमध्ये सर्वाधिक धावा करण्याचा विक्रम आपल्या नावावर केला. विराटच्या आता 334 धावा झाल्या आहेत. यापूर्वी हा विक्रम श्रीलंकेच्या कुमार संगकाराच्या (320 धावा) नावावर होता. या यादीत महेला जयवर्धने (270) तिसऱ्या, अॅडम गिलख्रिस्ट (262) चौथ्या, रिकी पाँटिंग (247) पाचव्या आणि रोहित शर्मा (237) सहाव्या स्थानावर आहे.

750 धावांचा टप्पा ओलांडला (Virat Kohli ICC Finals)

या अर्धशतकासह कोहलीने स्पर्धेत 750 धावांचा टप्पा ओलांडला. एकदिवसीय विश्वचषकाच्या 48 वर्षांच्या इतिहासात कोहली स्पर्धेच्या एकाच आवृत्तीत 750+ धावा करणारा पहिला फलंदाज बनला. याआधी सर्वाधिक धावांचा विक्रम सचिन तेंडुलकरच्या (673) नावावर होता.

9 वेळा 50+ धावा

विराट कोहलीने वर्ल्ड कप 2023 मध्ये 9 वेळा 50+ धावा केल्या. तर सलग 5वा सामना होता जेव्हा त्याच्या बॅटमधून 50+ वसूल झाल्या. याआधी 2019च्या विश्वचषक स्पर्धेतही विराटने सलग 5 सामन्यात 50+ धावा फटकावल्या होत्या.

वर्ल्ड कपमध्ये सलग पाच वेळा 50+ धावा करणारे फलंदाज

5 स्टीव्हन स्मिथ 2015 मध्ये
5 विराट कोहली 2019 मध्ये
5 विराट कोहली 2023 मध्ये

उपांत्य आणि अंतिम सामन्यात 50+ धावा

विश्वचषक स्पर्धेच्या उपांत्य आणि अंतिम फेरीत 50+ धावा करणारा विराट हा जगातील सातवा फलंदाज बनला आहे. त्याने उपांत्य फेरीत न्यूझीलंड विरुद्ध 113 चेंडूत 117 धावांची खेळी केली होती. तर अंतिम सामन्यात त्याने ऑस्ट्रेलियाविरुद्ध 54 धावा केल्या. विराटच्या आधी सहा फलंदाजांनी विश्वचषक स्पर्धेच्या उपांत्य फेरीत आणि अंतिम फेरीत 50+ धावा फटकावल्या आहेत. यात माईक ब्रेअरली (1979), डेव्हिड बून (1987), जावेद मियांदाद (1992), अरविंदा डी सिल्वा (1996), ग्रँट इलियट (2015), स्टीव्ह स्मिथ (2015) यांचा समावेश आहे.

विश्वचषकाच्या उपांत्य आणि अंतिम सामन्यात 50+ धावा करणारे फलंदाज

विराट कोहली (2023)
स्टीव्ह स्मिथ (2015)
ग्रँट इलियट (2015)
अरविंदा डी सिल्वा (1996)
जावेद मियाँदाद (1992)
डेव्हिड बून (1987)
माइक ब्रेर्ली (1979)

Information Source / Image Credits

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *