ऑस्ट्रेलियाने कप उचलला…’हार्ट ब्रेकींग मुव्हमेंट’वेळी महेंद्रसिंग धोनी काय करत होता? पाहा व्हिडीओ

Mahendrasingh Dhoni Video: अहमदाबादच्या नरेंद्र मोदी स्टेडियमवर झालेल्या वर्ल्ड कप 2023 मध्ये ऑस्ट्रेलियाने टीम इंडियावर मात केली. ऑस्ट्रेलियाने आपला सहावा एकदिवसीय वर्ल्ड कप जिंकला. याआधी 1987,1999, 2003, 2007,  आणि 2015 मध्ये विजय मिळवला होता. टीम इंडिया हरल्यानंतर संपूर्ण देश दु:खात गेला. कॅप्टन रोहित शर्मा आणि अनेक टीम मेंबर्सच्या डोळ्यात पाणी आले. दरम्यान यावेळी माजी कॅप्टन महेंद्रसिंग धोनीबद्दल चर्चा झाली. पण मॅच सुरु असताना, ऑस्ट्रेलिया ट्रॉफी हातात घेत असताना महेंद्रसिंग धोनी कुठे होता? असा प्रश्न विचारला जातोय. 

19 नोव्हेंबर रोजी महेंद्रसिंग धोनीची बायको साक्षीचा वाढदिवस होता. त्याने आपली पत्नी आणि मुलगी जीवासोबत केक कापून आपला वाढदिवस साजरा केला. मॅच दरम्यानचा एक व्हिडीओ सोशल मीडियात व्हायरल होतोय. यामध्ये महेंद्रसिंग धोनी आपला परिवार आणि मिंत्रासोबत मिळून मॅचचा आनंद घेत आहे. धोनी आरामाच खुर्चीवर बसलाय. धोनीने सध्या क्रिकेटमधून ब्रेक घेतला असून आगामी आयपीएलची तयारी करत आहे. 

नुकताच तो आपली पत्नी साक्षीसोबत उत्तराखंडमध्ये आपल्या वडिलांच्या गावी गेलाय. तिथे त्याने प्रवासाचा व्हिडीओ शेअर केलाय. हा फोटो सोशल मीडियात खूप व्हायरल होतोय. 

Related News

पंतप्रधानांनी केलं सांत्वन 

टीम इंडियाच्या पराभावानंतर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी पोस्ट करत टीम इंडियाचं सांत्वन केलं आहे. प्रिय टीम इंडिया, विश्वचषक स्पर्धेत तुमची प्रतिभा आणि जिद्द लक्षात घेण्याजोगी होती. तुम्ही मोठ्या भावनेने खेळलात आणि देशाला मोठा अभिमान मिळवून दिला. आम्ही आज आणि सदैव तुमच्या पाठीशी उभे आहोत, असं पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी ट्विट करत म्हटलं आहे. त्याचबरोबर नरेंद्र मोदी यांनी ऑस्ट्रेलियाचं देखील कौतूक केलं आहे. विश्वचषकातील शानदार विजयाबद्दल ऑस्ट्रेलियाचे अभिनंदन! स्पर्धेतील त्यांची प्रशंसनीय कामगिरी होती, ज्याचा शेवट शानदार विजयात झाला. आजच्या उल्लेखनीय खेळाबद्दल ट्रॅव्हिस हेडचे अभिनंदन, असं म्हणत नरेंद्र मोदी यांनी कांगारूंचं अभिनंदन केलंय.



Information Source / Image Credits

Related News

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *