पुणेकरांवर पाणीकपातीचे संकट; ‘या’ तारखेला अनेक भागांमध्ये पाणी पुरवठा बंद

Pune Water Cut: भरपावसाळ्यात पुणेकरांवर पाणीकपातीचे संकट ओढवणार आहे. पुणे महानगरपालिकेने शहरातील काही भागात 10 ऑगस्ट रोजी पाणी कपात होणार असल्याची माहिती दिली आहे. महावितरण (Maharashtra State Electricity Distribution) पर्वती जल केंद्रात देखभाल दुरुस्तीचे काम हाती घेण्यात येणार आहे. या देखभालीच्या कामामुळं 10 ऑगस्ट रोजी पुणे शहरातील काही भागात पाणी कपात करण्यात येणार आहे. तर, 11 ऑगस्ट रोजी कमी दाबाने पाणी पुरवठा होणार आहे. 

10 ऑगस्ट रोजी पुणेकरांना पाणीटंचाईचा सामना करावा लागणार आहे. त्यामुळं आदल्या दिवशीच गरजेचा पाणीसाठा करुन ठेवावा, असं आवाहन पुणे पालिकेकडून करण्यात आले आहे.

पर्वती MLR टँक परिसर

गुरुवार पेठ, बुधवार पेठ, काशेवाडी, क्वार्टर गेट, गंज पेठ, भवानी पेठ, नाना पेठ, लोहिया नगर, सोमवार पेठ, अरुण वैद्य स्टेडियम परिसर, घोरपडे पेठ, या भागात पाणीपुरवठा 10 ऑगस्ट रोजी येणार नाहीये 

Related News

पर्वती HLR टँक परिसर

सहकार नगर, पद्मावती, बिब्वेवाडी, मुकुंदनगर, महर्षीनागर, गंगाधाम, चिंतामणी नगर इत्यादी

पर्वती LLR टँक परिसर

पुणे शहरातील सर्व पेठा, दत्तावाडी, राजेंद्रनगर, डेक्कन, शिवाजीनगर, स्वारगेट इत्यादी

SNDT MLR टँक परिसर

एरंडवणे, कर्वे रोड, लॉ कॉलेज रोड, भांडारकर रोड, हॅपी कॉलनी, मयूर कॉलनी, सहवास सोसायटी परिसर

चतुर्शृंगी टँक परिसर

औंध, बोपोडी, भोईटे वस्ती, पुणे विद्यापीठ, चिखलवाडी, खडकी, आनंद पार्क, सानेवाडी, आंबेडकर वसाहत, संकल्प पार्क, इत्यादी

लष्कर जल केंद्र परिसर 

लष्कर परिसर, पुणे स्टेशन, कोरेगाव पार्क, ताडीवाला रोड, रेसकोर्स परिसर, वानवडी, हडपसर, मुंढवा, येरवडा, विश्रांतवाडी इ.

वडगाव जल केंद्र क्षेत्र

हिंगणे, आनंदनगर, वडगाव, धायरी, आंबेगाव पाथर, दत्तनगर, धनकवडी, कात्रज, इत्यादी

दरम्यान, या भागात 10 ऑगस्ट रोजी पाणीपुरवठा बंद असेल. त्याव्यतिरिक्त 11 ऑगस्ट रोजी या भागात कमी दाबाने पाणी पुरवठा होण्याची शक्यता आहे. त्यामुळं रहिवाशांनी याची नोंद घ्यावी आणि त्याची रहिवाशांनी नोंद घ्यावी व त्यानुसार योग्य ती व्यवस्था करावी, असं आवाहन पालिकेने केली आहे. 



Information Source / Image Credits

Related News

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *