जलसाठा: पश्चिम विदर्भात मागील वर्षाच्या तुलनेने 330 दलघमी जलसाठा कमी तुर्तास 65 टक्के जलसाठा, पावसाची प्रतिक्षा

अकोला20 मिनिटांपूर्वी

  • कॉपी लिंक

पश्चिम विदर्भातील जलसाठ्यात मागील वर्षाच्या तुलनेने यावर्षी 330.42 दशलक्ष घनमिटर जलसाठा कमी आहे. प्रकल्पाच्या जलसाठ्यात वाढ होण्यासाठी पश्चिम विदर्भातील प्रकल्पांना अद्यापही जोरदार पावसाची प्रतिक्षा आहे.

पश्चिम विदर्भातील अकोला, अमरावती, बुलडाणा, यवतमाळ, वाशिम या पाच जिल्ह्यात 9 मोठे, 27 मध्यम आणि 245 लघु असे एकुण 281 प्रकल्प आहे. या प्रकल्पामुळे 3081.90 दशलक्ष घनमिटर साठवण क्षमता निर्माण झाली आहे. यावर्षी जुन महिन्यात पावसाने दडी मारल्याने तसेच जुलै महिन्यात पुरेसा पाऊस न झाल्याने पश्चिम विदर्भातील जलप्रकल्पात मुबलक जलसाठा उपलब्ध झाला असला तरी मागील वर्षाच्या तुलनेने जलसाठ्यात घट आहे. यावर्षी 9 ऑगस्ट रोजी एकुण साठवण क्षमतेच्या 2015.42 दशलक्ष घनमिटर जलसाठा उपलब्ध झाला आहे. 9 ऑगस्ट 2022 च्या तुलनेने 330.42 दलघमीने जलसाठ्यात घट आहे. त्यामुळे पश्चिम विदर्भातील जलसाठ्यात वाढ होण्यासाठी अद्यापही जोरदार पावसाची प्रतिक्षा करावी लागणार आहे.

सर्वाधिक घट मोठ्या प्रकल्पात

पश्चिम विदर्भात एकुण 9 मोठे प्रकल्प आहेत. या प्रकल्पामुळे 1399.91 दलघमी साठवण क्षमता निर्माण झाली आहे. तुर्तास 901.41 दलघमी जलसाठा उपलब्ध झाला आहे. 9 ऑगस्ट 2022 रोजी मोठ्या प्रकल्पात 1114.92 दलघमी जलसाठा उपलब्ध होता. त्यामुळे यावर्षी 213.51 दलघमीची तुट आहे. तर 27 मध्यम प्रकल्पामुळे 771.72 दलघमी साठवण क्षमता निर्माण झाली आहे. तुर्तास 515.16 दलघमी जलसाठा उपलब्ध आहे तर 9 ऑगस्ट 2022 रोजी मध्यम प्रकल्पात 609.19 दलघमी जलसाठा उपलब्ध होता. ही तुट 94.02 दलघमीची आहे. 245 लघु प्रकल्पामुळे 910.27 दलघमी साठवण क्षमता निर्माण झाली आहे. तुर्तास 598.85 दलघमी जलसाठा उपलब्ध होता मागील वर्षी 621.73 दलघमी उपलब्ध होता ही तुट 22.88 दलघमीने आहे.

Information Source / Image Credits

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *