WC 2023: भारताचे हे 6 खेळाडू पहिल्यांदाच खेळणार वर्ल्ड कप, पाहा कशी आहे कामगिरी

World Cup 2023: भारतात 5  ऑक्टोबर ते 19 नोव्हेंबरदरम्यान एकदिवसीय विश्वचषक स्पर्धा खेळवली जाणार आहे. बीसीसीसीआयने (BCCI) पंधरा खेळाडूंच्या भारतीय संघाची (Team India) घोषणा केलीय.  कर्णधार रोहित शर्माच्या (Rohit Sharma) नेतृत्वात खेळणाऱ्या पंधरा खेळाडूंपैकी सहा खेळाडू हे पहिल्यांदाच विश्वचषक स्पर्धा खेळणार आहेत. 1983 नंतर 2011 मध्ये टीम इंडियाने विश्वचषक जेतेपदाला गवसणी घातली होती. महेंद्रसिंग धोणीच्या नेतृत्वात भारताने विश्वचषक जिंकण्याची किमया साधली. त्यानंतर आता तिसऱ्यांदा विश्वचषक जिंकण्यासाठी रोहित सेना मैदानात उतरेल. यासाठी बीसीसीआयने युवा खेळाडूंवर विश्वास दाखवला आहे. 

1. शुभमन गिल (Shubhaman Gill)
टीम इंडियातला सध्याचा हुकमी सलामीवीर म्हणून शुभमन गिलकडे पाहिलं जातं. 23 वर्षांच्या गिलकडून भारतीय संघाला मोठ्या अपेक्षा आहेत. गेल्या वर्षभरात शुभमन गिलने प्रत्येक फॉर्मेटमध्ये दमदार कामगिरी केली आहे. टीम इंडियात एन्ट्री घेण्यासाठी अनेक खेळाडूंमध्ये तीव्र स्पर्धा असताना शुभमन गिलने संघात आपली जागा पक्की केली आहे. 

2. ईशान किशन (Ishan Kishan)
विकेटकिपर-फलंदाज ईशान किशन टीम इंडियासाठी पहिल्यांदाच विश्वचषक खेळणार आहे. केएल राहुलच्या एन्ट्रीमुळे विश्वचषकासाठीच्या पंधरा खेळाडूंमध्ये ईशान किशनाला संधी मिळणार की नाही याबाबत साशंकता व्यक्त केली जात होती. पण एशिया कप स्पर्धेत पाकिस्तानविरुद्धच्या महत्त्वाच्या सामन्यात ईशान किशनने 82 धावांची खेळी केली आणि विश्वचषक स्पर्धेसाठी आपला दावा ठोकला. विशेष म्हणजे प्रत्येक क्रमांकावर फलंदाजी करताना ईशानने स्वत:ला सिद्ध केलं आहे.

Related News

3. सूर्यकुमार यादव (Suryakumar Yadav)
गिल आणि ईशानप्रमाणचे सूर्यकुमार यादवही पहिल्यांदाच विश्वचषक स्पर्धा खेळेल. गेल्या वर्षभरात आपल्या आक्रमक खेळीने सूर्यकुमार यादव याने आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये छाप उमटवली आहे. 2021 मध्ये वयाच्या तिसाव्या वर्षी सूर्यकुमारने आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये पदार्पण केलं. टी20 क्रिकेटमध्ये त्याने 46.02 च्या स्ट्राईकरेटने 1841 धावा केल्या आहेत. पण एकदिवसीय क्रिकेटमध्ये त्याची कामगिरी म्हणावी तशी समाधानकारक  झालेली नाही.

4. श्रेयस अय्यर (Shreyas Iyer)
दुखापतीतून सावरल्यानंतर मधल्या फळीतला आक्रमक फलंदाज श्रेयस अय्यरची टीम इंडियात एन्ट्री झाली आहे. दुखापतीमुळे गेला काही काळ श्रेयस अय्यर फारसे आंतरराष्ट्रीय सामने खेळू शकलेला नाही. त्यामुळे त्याच्यावर थोडासा दबाव नक्कीच असणार. 28 वर्षांच्या श्रेयस अय्यरने चौथ्या क्रमांकावर फलंदाजी करताना आतापर्यंत चांगली कामगिरी केली आहे. कोणताही दबाव न घेता आक्रमक फलंदाजी करणं ही श्रेयस अय्यरची जमेची बाजी आहे. 

5. मोहम्मद सिराज (Mohammed Siraj)
भारताच्या प्रमुख वेगवान गोलंदाजांमध्ये बुमराह आणि शमीबरोबरच आता मोहम्मद सिराजचही नाव घेतलं जातं. सिराज आता टीम इंडियाचा मुख्य गोलंदाज बनला आहे. वेस्ट इंडिज दौऱ्यात जसप्रीत बुमराहच्या अनुपस्थितीत सिराजने वेगवान गोलंदाजीची धुरा समर्थपणे सांभाळली होती. नवा चेंडू स्विंग करण्यात सिराज माहिर आहे. पण डेथ ओव्हरमध्ये त्याच्यावर दबाव वाढतो ही त्याची कमकुवत बाजू अनेकवेळा समोर आली आहे. 29 वर्षांच्या मोहम्मद सिराजने एकदिवसीय क्रिकेटमध्ये आतापर्यंत खेळलेल्या 26 सामन्यात 46 विकेट घेतल्या आहेत. 

6. शार्दुल ठाकुर (Shardul Thackur)
भारताचा ऑलराऊंडर शार्दुल ठाकूर पहिल्यांदाच विश्वचषक स्पर्धा खेळणार आहे. मुंबईचा हा मध्यमगती गोलंदाज पालघर एक्स्प्रेस नावाने ओळखला जातो. भागिदारी तोडण्यात शार्दुल ठाकूर एक्स्पर्ट आहे. विशेष म्हणजे चेंडू दोन्ही बाजूने स्विग करण्याची त्याची हातोटी आहे. वेगवेगळ्या टप्प्यावर गोलंदाजी करत फलंदाजाला विकेट फेकण्यास भाग पाडण्यात शार्दुल ठाकूरचा हात कोणी धरू शकत नाही. शिवाय आठव्या क्रमांकावर तो एक उपयुक्त फलंदाजही आहे. Information Source / Image Credits

Related News

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *