- Marathi News
- Local
- Maharashtra
- Pune
- ‘We Don’t Want Mercy, We Want Equal Treatment’ Installation Of Ganesha Idol By Third party Social Worker Amit Alias Amrapali Mohite
पुणे31 मिनिटांपूर्वी
- कॉपी लिंक
आम्हाला दया नको तर समान वागणूक हवी, असे तृतीयपंथी समाजसेविका अमित उर्फ आम्रपाली मोहिते यांनी ‘स्व-‘ रूपवर्धिनी स्पर्धा परीक्षा केंद्र व अभ्यासिकेच्या श्रीमकांचा बाप्पा उपक्रमात बोलताना व्यक्त केले. यावेळी आम्रपाली यांच्या हस्ते गणेश मूर्तीची प्रतिष्ठापना करण्यात आली.
आम्रपाली यांनी स्पर्धा परीक्षांचा अभ्यास करणाऱ्या विद्यार्थ्यांसोबत संवाद साधताना तृतीयपंथी समाजाच्या व्यथा मांडल्या. तृतीयपंथींना सहानुभुती नव्हे तर समान वागणुकीची गरज आहे. ते ही आपल्या समाजातील एक घटक आहेत हे मान्य करून त्यांना आपलेपणाने स्वीकारा. रोजगाराच्या संधी उपलब्ध करून द्या, असे आम्रपाली यांनी सांगितले.
आम्रपाली सावली सोशल फौंडेशनच्या संस्थापक अध्यक्ष आहेत. तृतीयपंथींच्या न्याय हक्कासाठी काम करताना त्यांनी पुणे शहरात सहा ठिकाणी गरीब मुलांसाठी ‘फुटपाथ शाळा’ सुरु केल्या. आपल्या संस्थेच्या माध्यमातून त्यांनी १४५ गरजू विद्यार्थ्यांच्या शिक्षणाचा खर्च उभा केला, तसेच 192 लोकांना छोटे व्यवसाय सुरु करून दिले आहेत. ‘स्व-‘ रूपवर्धिनी संस्थेचे कार्याध्यक्ष डॉ संजय तांबट, संस्थेच्या जेष्ठ पूर्णवेळ कार्यकर्त्या पुष्पाताई नडे यांनी आम्रपाली मोहितेंचा भारतीय संविधानाचा सरनामा देऊन सन्मान केला.
पुणे फेस्टिव्हलच्या श्रींची प्रतिष्ठापना संपन्न
35 व्या पुणे फेस्टिव्हलच्या श्रींची प्रतिष्ठापना हॉटेल सारस, नेहरू स्टेडियम, पुणे येथे स्वाती व विक्रम कुमार (आयुक्त, पुणे महानगरपालिका) यांच्या शुभहस्ते विधिवत संपन्न झाली. याप्रसंगी अभिनेत्री तेजस्विनी लोणारी आणि प्राजक्ता गायकवाड प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होत्या. पुणे फेस्टिव्हलचे उपाध्यक्ष कृष्णकुमार गोयल, मुख्य समन्वयक अॅड. अभय छाजेड, , माजी महापौर कमल व्यव्हारे , डेक्कन मुस्लिम इंस्टीट्यूटचा अध्यक्षा आबेदा इनामदार ,बाळासाहेब अमराळे , राजू साठे , द.स पोळेकर, अतुल गोंजारी , राजू साठे, अशोक मेंमजादे, रवींद्र दुर्वे , सुप्रिया ताम्हाणे, संयोगिता कुदळे, अनुराधा भारती ,निकिता मोघे व कार्यकर्ते मोठ्ये संख्येने उपस्थित होते.