मुंबई19 मिनिटांपूर्वी
- कॉपी लिंक
मराठा समाजाला आरक्षण मिळाले पाहिजे ते टिकले पाहिजे ही भूमिका आमची आहे. आम्ही टास्क फोर्सची स्थापना केली आहे. मराठा समाजाला आरक्षण देण्याची भूमिका सरकारची आहे. मराठा समाज मागासलेला आहे आणि ते सिद्ध व्हायला हवे. सरकार पूर्णपणे मराठा समाजाला आरक्षण देण्याच्या बाजूने आहे. ओबीसी समाजातील विद्यार्थ्यांना जे फायदे मिळतात ते देत आहोत. आंदोलनांच्या आडून शांतता बिघडवण्याचा प्रयत्न होत आहे, असे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे म्हणाले.
कुणबीचा दाखल्यासाठी एक समिती स्थापन
मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी मराठा समाजाला कुणबीचा दाखला देण्याचा विचार करण्यासबंधी एक समिती स्थापन करण्याची घोषणा केली आहे. ही समिती एका महिन्याभरात आपला अहवाल सादर करेल. त्यानंतर सरकार योग्य तो निर्णय घेईल, असे ते म्हणालेत. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी मराठा आंदोलकांवर दाखल करण्यात आलेले चुकीचे गुन्हे मागे घेण्याचीही घोषणा केली आहे.
समाजाच्या बाबतीत सरकार गंभीर
मुख्यमंत्री एकनाथ शिंदे म्हणाले की, मराठा समाजाची आंदोलन यापूर्वी देखील झाले. जवळपास ५८ मोर्चे महाराष्ट्रात महाराष्ट्रात निघाले. मराठा समाज शिस्तबद्ध आहे. आंदोलनाच्या अडून काही लोक जे महाराष्ट्रात राजकारण करू इच्छितात. तब्येतीची काळजी घेण्याची गरज आहे. मराठा समाजाच्या बाबतीत गांभीर्याने काम करतो. दिवसभर रात्र त्यावर काम करण्याचे काम केले.
काही लोक पुरावे सादर करण्यात अपयशी
काही लोक ज्यामध्ये ज्या प्रकारचे भाषण करतात. ज्या पद्धतीने मराठा समाजाला आरक्षण मिळाले पाहिजे. ही भूमिका घेतली. तेव्हा काही बाब सुप्रीम कोर्टोच्या निदर्शनास आणून देण्यासाठी का कमी पडले. मात्र, आमचे सरकार त्यासाठी काम करत आहे. त्यात पुरावे आहेत. त्या कशा आणता येतील त्यावर काम सुरू आहे.
3700 अधिसंख्या पदाचा निर्णय घेतला
अधिसंख्यापदाच्या बाबतीत निर्णय घेतला गेला नाही. ३७०० अधिसंख्या पदाचे भवितव्याचे पहिला निर्णय घेतला. त्यानंतर अनेक निर्णय घेतले. अण्णासाहेब पाटील आर्थिक विकास महामंडळांचे बजेट वाढले आहे. परदेशी शिकण्यासाठी जाणाऱ्या मुलांना त्यासाठी . आम्ही कुणाची फसवणूक करायची नाही. आम्ही पूर्णपणे त्यांच्या पाठीशी आहे. असे शिंदे म्हणाले.
हे ही वाचा
जालन्यातील घटनेबद्दल क्षमायाचना करतो:गृहमंत्री देवेंद्र फडणवीसांनी मागितली माफी, दोषी पोलिसांवर कारवाई करणार

जालन्यात मराठा आंदोलकांवर झालेला लाठीहल्ला अत्यंत चुकीचा होता. या घटनेबद्दल मी क्षमायाचना करतो. क्षमा मागतो, अशा शब्दांत राज्याचे गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी खेद व्यक्त केला आहे. – येथे वाचा संपूर्ण बातमी