साप्‍ताहिक राशिभविष्य : Weekly Horoscope , १७ सप्‍टेंबर २०२३ | महातंत्र

चिराग दारूवाला

चिराग दारूवाला हे प्रसिद्ध ज्‍योतिषी आहेत. सुप्रसिद्ध ज्‍योतिषी बेजान दारूवाला यांचे ते सुपुत्र आहेत. करीअर, आरोग्य, प्रेम, विवाह, अर्थ, व्यवसाय या संदर्भात ते मार्गदर्शन करतात. www. bejandaruwalla.com या वेबसाईटवर तसेच info@bejandaruwalla.com या मेलवर त्यांच्याशी संपर्क साधता येईल.

राशिभविष्य

मेष : श्रीगणेश सांगतात की, या आठवड्यात तुमची अनेक महत्त्वाची कामेही पूर्ण होणार आहेत. आर्थिक लाभ संभवतो. लोकांशी व्यवहार करताना सावधगिरी बाळगा. ज्येष्ठांचे मार्गदर्शन लाभेल. व्यवसायात लाभादायक स्‍थिती, अनेक संधी मिळतील. मनाच्या अस्थिरतेवर नियंत्रण ठेवणे आवश्यक आहे.

वृषभ

वृषभ : काही इच्छा पूर्ण होण्याचा मार्ग या आठवड्यात मोकळा होईल. व्यापारात लाभाच्या नवीन शक्यता दृष्‍टीक्षेपास येईल, असे श्रीगणेश म्‍हणतात. घरात वातावरण प्रसन्‍न राहिल. दानधर्मामुळे धर्माविषयी आस्‍था वाढेल. भावाच्या विचित्र वागण्याने मन उदास होऊ शकते. घाईत केलेल्या कामामुळे नुकसान होऊ शकते. मुलाच्या वर्तनावर लक्ष ठेवा,

राशिभविष्य

मिथुन : श्रीगणेश सांगतात की, या आठवड्यात महत्त्वाच्या लोकांशी संबंध दृढ होतील. अचानक धनप्राप्तीचे योग आहेत. सर्जनशीलता वाढेल. विचारांची दिशा तुम्हाला एक नवीन स्तर देईल. ज्येष्ठांच्या अनुभवाचा फायदा होईल. अनावश्यक वादामुळे कुटुंबातील सदस्याला त्रास होईल. आळसात वेळ वाया घालवल्याने मन अस्वस्थ होईल.

कर्क

कर्क : करिअरसाठी हा आठवडा संधी देणारा ठरेल . व्यवसायाच्या विस्तारामुळे आनंद मिळेल आणि प्रतिष्ठा वाढेल, असे श्रीगणेश म्‍हणतात. कोणतीही जुनी विसरलेली गुंतवणूक कामी येईल. बुद्धीचा विकास होईल; पण त्याच वेळी मानसिक गोंधळ वाढण्‍याची शक्‍यता. आर्थिक स्थिती चांगली राहील. नोकरी करणाऱ्या लोकांचा प्रभाव वाढेल. कामाच्या ठिकाणी काही अडथळ्यांनंतर यश मिळेल. महत्त्वाच्या कामात यश मिळू शकते.

सिंह

सिंह : या आठवड्यात तुम्‍हाला व्यवसायात अनेक लाभांच्‍या संधी उपलब्‍ध होतील. ज्येष्ठांकडून लाभ होईल. जुनी समस्या सुटण्‍याची शक्‍यता . नोकरदार लोकांचा प्रभाव वाढेल. तुम्‍ही केलेल्‍या कामाचे कौतुक होईल. तुम्ही जे काही बोलता ते योग्‍य पद्धतीने मांडता येईल, यासाठी प्रयत्‍न करा, असा सल्‍ला श्रीगणेश देतात.

कन्या

कन्या : गणेश म्हणतात की, या आठवड्यात तुम्‍हाला आत्‍मविश्‍वासच्‍या जोरावर यश मिळेल. तुमच्‍या प्रशंसा होईल. परदेशी संपर्क लाभदायक ठरतील. शिक्षणाप्रती संवेदनशीलताही वाढेल. मुलांच्या चिंता वाटेल. विनाकारण लहान समस्या मोठे होईल. मात्र प्रतिकूल परिस्थितीत तुमचा आत्मविश्वास कायम राहील.

तुळ

तूळ : हा आठवडा चढ-उताराचा असल्‍याने संमिश्र परिणाम देईल, असे श्रीगणेश सांगतात. तुमचा आदर वाढेल. सहकाऱ्यांचे पूर्ण सहकार्य मिळेल. सप्ताहाच्या सुरुवातीला परोपकाराची वृत्ती वाढेल.एखाद्या शुभ कार्याची योजना करू शकता. नकारात्मक बातम्यांमुळे चिंता वाटेल. संतती सुख लाभेल. पाय आणि पाठदुखी जाणवण्‍याची शक्‍यता.

राशिभविष्य

वृश्चिक : तुमच्‍यासाठी आठवडा लाभदायक आहे. वाणी आणि बुद्धीचा विकास होईल. तुमच्यासाठी उत्पन्नाचे नवीन मार्ग निर्माण होतील, असे श्रीगणेश सांगतात. आठवड्याच्या सुरुवातीला, काही गोष्टी जाणीवपूर्वक कराल. यामुळे एकतर ध्येय साध्य होईल किंवा सकारात्‍मक अनुभव घ्‍याल.

राशिभविष्य

धनु : या आठवड्यात तुम्‍हाला उच्च-स्तरीय संबंधांमुळे दूरगामी फायद्यांचा मार्ग मोकळा होईल, असे श्रीगणेश सांगतात. कोणत्‍याही गोष्‍टीवर तत्‍काळ प्रतिक्रिया देवू नका, अनावश्यक धाडस दाखवणे टाळा. तुम्ही केलेली जुनी गुंतवणूक लाभदायक ठरू शकते. आरोग्याच्‍या तक्रारी जाणवतील.

राशिभविष्य

मकर : या आठवड्यात जास्त खर्च होईल, पण उत्पन्न चांगले राहिल, असे श्रीगणेश सांगतात. तुमची निर्भयता आणि विचारशीलता वाढेल. नवीन आशा आनंद देईल.दान, सेवा आणि परोपकारात रुची वाढेल. नवीन संपर्क लाभदायक ठरतील. जोडीदाराबरोबरील मतभेद दूर होतील. प्रकृती उत्तम राहील.

कुंभ

कुंभ : या आठवड्यात सुखात वाढ होईल. अधिक परिश्रम आणि समजूतदारपणाचा तुम्हाला फायदा होईल. आरोग्यामध्ये चढ-उतार अनुभवाल. विवेकबुद्धी वाढेल. सल्ला घेणे फायदेशीर ठरेल, असा सल्‍ला श्रीगणेश देतात.

मीन

मीन : या आठवड्यात प्रतिकूल परिस्थितीवर मात कराल, असे विरोधक त्यांच्याच खेळात बाजी मारतील. या आठवड्यात तुमची काही गुंतागुंतीची कामे मार्गी लागतील. सप्ताहाच्या सुरुवातीला केलेले प्रयत्न फलदायी ठरतील. नवीन कल्पनांचे कौतुक होईल. धार्मिक रुची वाढेल, असे श्रीगणेश सांगतात.

Information Source / Image Credits

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *