नवी दिल्ली : मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांच्या गटाविरोधात आमदार अपात्रतेबाबत (shiv sena MLA disqualification case) विधानसभा अध्यक्षांनी तातडीने निर्णय घ्यावा, उशीर करु नये. कोर्टाच्या निर्णयाचा आदर करा, असे खडे बोल सुप्रीम कोर्टाने (Supreme Court) राहुल नार्वेकर (Rahul Narvekar) यांना सुनावले. महाराष्ट्राच्या सत्तासंघर्षाबाबत (Maharashtra political crisis) शिवसेना (Shiv Sena) ठाकरे गटाने दाखल केलेल्या याचिकेवर आज सुप्रीम कोर्टात सुनावणी झाली. ठाकरे गटाकडून कपिल सिब्बल (Kapil Sibal ) यांनी बाजू मांडताना राहुल नार्वेकर वेळकाढूपणा करत असल्याचा युक्तीवाद केला. त्याला अध्यक्षांच्या बाजूने महाधिवक्ते तुषार मेहता (Tushar Mehta) यांनी युक्तीवाद करुन उत्तर दिले.
सुप्रीम कोर्टाने आजच्या युक्तीवादानंतर राहुल नार्वेकरांना खडे बोल सुनावले. वेळकाढूपणा चालणार नाही. कोणत्याही प्रकरणात अनिश्चितता असू शकत नाही. जवळपास 4 महिने झाले, तुम्ही कोणतीच कारवाई का केली नाही? असे सवाल सुप्रीम कोर्टाने राहुल नार्वेकरांना विचारले.
मुंबई24 मिनिटांपूर्वीकॉपी लिंकशिवसेनेच्या ठाकरे गटाने शनिवारी उत्तर पश्चिम मुंबई (वायव्य) लोकसभा मतदार संघाचा आढावा घेतला. त्यात उद्धव ठाकरे यांनी या मतदार संघातून अमोल कीर्तिकर यांना उमेदवारी देण्याचे संकेत दिल्याची माहिती आहे. अमोल हे शिंदे गटाचे विद्यमान खासदार गजानन कीर्तिकर यांचे...
मुंबई32 मिनिटांपूर्वीकॉपी लिंकमुंबई महापालिकेतील कथित कोविड घोटाळ्यात BMC अधिकारी व राजकीय नेत्यांना लाच म्हणून सोन्याची बिस्किटे व नाणी देण्यात आल्याचा दावा अंमलबजावणी संचालनालयाने (ईडी) आपल्या आरोपपत्रात केला आहे. यामुळे हे अधिकारी व राजकारणी कोण? अशी चर्चा सुरू झाली आहे.ईडीच्या आरोपपत्रानुसार,...
मुंबई40 मिनिटांपूर्वीकॉपी लिंकमराठवाड्यात गुपचूपपणे मराठ्यांना सरसकट ओबीसी प्रमाणपत्र वाटप करण्यात येत असल्याचा गंभीर आरोप विधानसभेतील विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार यांनी केला आहे. या प्रकरणी त्यांनी 28 लाख लोकांना पैसे देवून ओबीसी जात प्रमाणपत्र देण्यात आल्याचा दावा केला आहे. विशेषतः विधान...
मुंबई: आमदार अपात्रताप्रकरणात शिवसेना ठाकरे गटाने (Shiv Sena Thackeray) जोरदार हालचाली सुरु केल्या आहेत. त्याचाच एक भाग म्हणून ठाकरे गटाने विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर (Rahul Narvekar) यांच्याविरोधात सुप्रीम कोर्टात अॅफेडेव्हिट सादर केलं आहे. विधानसभा अध्यक्षांनी...
रत्नागिरीएका तासापूर्वीकॉपी लिंकमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे विश्वासू मंत्री उदय सामंत यांच्या भावाने व्हॉट्सअपला शिवसेनेच्या उद्धव ठाकरे गटाचे मशाल हे निवडणूक चिन्ह ठेवल्यामुळे राजकीय वर्तुळात चर्चेचे पेव फुटले आहे. उदय सामंत यांचे बंधू किरण सामंत हे सामंत यांच्यासोबतच राजकारणात आले होते....
मुंबई: शिवसेना आमदार अपात्रतेच्या कारवाईस विधानसभा अध्यक्षांकडून (Maharashtra Assembly Speaker) दिरंगाई होत असल्याच आरोप शिवसेना ठाकरे गटाकडून (Shiv Sena UBT) सातत्याने केला जात आहे. कोणत्या आधारावर घानातील राष्ट्रकुल संसदीय परिषदेला विधानसभा अध्यक्ष उपस्थित राहणार? असा...
मुंबईएका तासापूर्वीकॉपी लिंकउपमुख्यमंत्री अजित पवार व भाजप आमदार गोपीचंद पडळकर यांच्यातील राजकीय वाद सर्वश्रूत आहे. हे दोघे नेहमीच एकमेकांपुढे येणे टाळतात. पण आज हे दोन्ही नेते उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या निवासस्थानी एकत्र येण्याची शक्यता होती. पण अजित पवार येताच पडळकरांनी...
मुंबई40 मिनिटांपूर्वीकॉपी लिंकशिवसेनेच्या ठाकरे गटातील 3 माजी नगरसेवकांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वातील शिवसेनेत प्रवेश केला. हे तिघेही मुंबईच्या जोगेश्वरी भागातील सक्रीय पदाधिकारी आहेत. त्यांच्या सोडचिठ्ठीमुळे उद्धव ठाकरे यांना जबर झटका बसल्याची चर्चा आहे.यासंबंधीच्या वृत्तानुसार, जोगेश्वरीच्या प्रभाग क्रमांक 73 चे...
मुंबई (Mumbai) : राष्ट्रवादी काँग्रेसच्या (NCP) अजित पवार गटाच्या (Ajit Pawar Group) मुंबई अध्यक्षपदी समीर भुजबळ (Sameer Bhujbal) यांची वर्णी लागण्याची शक्यता आहे. आज दुपारी चार वाजता गरवारे क्लब इथे बैठक घेऊन अधिकृत घोषणा होण्याची...
मुंबई : शिवसेनेच्या 16 आमदारांच्या अपात्रतेची सुनावणी (Shivsena MLA Disqualification Case) सोमवारी, 25 सप्टेंबर रोजी पार पडली. त्यामध्ये ठाकरे गटाच्या वतीने सर्व याचिकांवर एकत्रित सुनावणी घ्या अशी मागणी करण्यात आली. तर या सर्वांना स्वतंत्र पुरावा...
मुंबई (Mumbai) : सर्वोच्च न्यायालयाने (Supreme Court) मुंबईसह राज्यातील व्यापारी संघटनेला दोन महिन्यात दुकानांवर मराठी पाट्या (Marathi Signboard) लावण्याचे आदेश दिले आहेत. मनसे अध्यक्ष राज ठाकरे (Raj Thackeray) यांनी सर्वोच्च न्यायालयाचे आभार मानले आहेत. 'मराठी...
Raj Thackeray On Marathi Shop Signboards: सर्वोच्च न्यायालयाने व्यापाऱ्यांना 2 महिन्यात दुकानांवर मराठी पाट्या लावण्याचे आदेश दिले आहेत. प्रकरण उच्च न्यायालयामध्ये गेलं तर भुर्दंड भरावा लागेल असंही कोर्टाने स्पष्ट केलं आहे. महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरेंनी या निर्णयावर पहिली...
सुप्रीम कोर्टात नेमकं काय घडलं? (Supreme Court on Shiv Sena Case )
आज सुप्रीम कोर्टात 15 मिनिटे खडाजंगी झाली. कपिल सिब्बल यांनी ठाकरे गटाकडून जोरदार युक्तीवाद केला. सुप्रीम कोर्टाने तीन महिन्यापूर्वी स्पष्ट निर्देष देऊनही अध्यक्ष राहुल नार्वेकर हे वेळकाढूपणा करत आहेत. आमदार अपात्रतेबाबत कोणतीही कारवाई करत नाहीत, असा युक्तीवाद सिब्बल यांनी केला.
कपिल सिब्बल यांचा युक्तीवाद (Kapil Sibal argument on Shiv Sena)
आमदार अपात्रतेचा हा खूप गंभीर विषय आहे. पाच अपात्रता याचिका दाखल केल्या आहेत. 2022 मध्ये 12 जुलै 2022 पर्यंत उत्तर द्यायचं होतं पण काहीच घडलं नाही. या तारखेपर्यंत नोटीसही जारी झालेली नाही. कोर्टने बजावलं होतं की योग्य कालावधीत निर्णय द्यावा. मात्र कोर्टाच्या निकालानंतर तीन वेळा अर्ज केला. 15, 23 मे आणि 2 जून त्यावर काहीच प्रतिसाद नाही. 18 सप्टेंबरला जेव्हा कोर्टाची तारीख आली त्याच्या आधी चार दिवस फक्त दिखावा म्हणून विधानसभा अध्यक्षांनी सुनावणी ठेवली. 2022 च्या प्रकरणात म्हणतात की आत्ता आम्हाला कागदपत्र मिळाले नाही. अध्यक्षांना या केस मध्ये ट्रिब्युनल अर्थात लवाद म्हणून काम करायचं आहे. सभागृहाचे अध्यक्ष म्हणून नाही, असा युक्तीवाद कपिल सिब्बल यांनी केला.
राहुल नार्वेकरांना सुनावणी घ्यावीच लागेल (What will Rahul Narvekar do?)
दरम्यान, आजच्या सुनावणीत काय काय झालं याची माहिती सुप्रीम कोर्टाचे वकील अॅड सिद्धार्थ शिंदे (Siddharth Shinde) यांनी एबीपी माझाशी बोलताना दिली.
सिद्धार्थ शिंदे म्हणाले, “कोर्टात आज 15 मिनिटे खडाजंगी झाली. सिब्बल यांनी युक्तीवाद मांडताना अनेक दाखले दिले. “आमदार अपात्रेबाबत राहुल नार्वेकरांनी पहिली सुनावणी जवळपास 3 महिन्यांनी म्हणजे 14 सप्टेंबरला घेतली. यानंतर पुढे कशी सुनावणी होईल याबाबत काहीच सांगितलं नाही. त्यामुळे नार्वेकर हे वेळकाढूपणा करत आहेत” असं सिब्बल म्हणाले. यावर कोर्टाने सांगितलं पुढची सुनावणीची तारीख द्यावी लागेल. राहुल नार्वेकरांना 1 आठवड्यात सुनावणी घ्यावीच लागेल. त्यानंतर याप्रकरणात नार्वेकरांना आपली बाजू मांडण्यासाठी दोन आठवड्यांचा अवधी दिला. त्यामुळे आमदार प्रकरणाची सुनावणी ऑक्टोबरच्या पहिल्या आठवड्यात होण्याची शक्यता आहे.
अनिल देसाई काय म्हणाले? (Anil Desai reaction on Shiv Sena)
दरम्यान, याप्रकरणी ठाकरे गटाचे खासदार अनिल देसाई यांनी दिल्लीत आपली प्रतिक्रिया दिली. ते म्हणाले “सुप्रीम कोर्टात दोन्ही बाजूने युक्तीवाद झाला. कोर्ट नार्वेकरांना म्हणाले, आम्ही निश्चित वेळ ठरवून दिला नसला, तरी तुम्ही 4 महिने उलटून गेले तरी काही केलं नाही. अध्यक्षांनी लवाद म्हणून काम करायला हवं. जे कागदपत्र आहेत त्याबाबत आठवड्यात सुनावणी घेऊन या. आम्ही दोन आठवड्यांनी पुन्हा सुनावणी घेऊ, असं सुप्रीम कोर्ट विधानसभा अध्यक्षांना सांगितलं”.
अध्यक्षांविरोधात ठाकरे गटाची याचिका, आत्तापर्यंत काय काय घडलं?
11 मे रोजी सत्ता संघर्षाचा निकाल आला
अपात्रतेचा निर्णय विधानसभा अध्यक्ष यांच्याकडे कोर्टाने सोपावला
शिवसेना ठाकरे गटाने 15 मे 22 मे आणि तीन जून अध्यक्षांना विनंती केली तातडीने सुनावणीसाठी
पण दाद न मिळाल्यामुळे चार जुलै रोजी सुप्रीम कोर्टात याचिका दाखल केली
या याचिकेवर 22 जुलैला सुनावणी होणार होती त्याच्या आधी एक आठवडा अध्यक्षांनी पहिली नोटीस काढली
22 जुलै च्या सुनावणीत सुप्रीम कोर्टाने अध्यक्षांना ठाकरे गटाच्या आरोपांबाबत उत्तर देण्यास सांगितलं
पुढची सुनावणी दोन आठवड्यानंतर होणे अपेक्षित होतं पण तारीख पुढे गेली आणि आज 18 सप्टेंबरला सुनावणी झाली
18 सप्टेंबर च्या सुनावणी आधी 14 सप्टेंबर रोजी अध्यक्षांनी अपात्रतेबाबत सुनावणी घेतली