Cricketers Diet : कसं असतं क्रिकेटपटूंचं डाएट? सामन्यापूर्वी नेमकं काय खातात खेळाडू?

Cricketers Diet : एशिया कपला ( Asia cup 2023 ) अखेर सुरुवात झाली आहे. यामध्ये पहिला सामना पाकिस्तान विरूद्ध नेपाळ यांच्यामध्ये खेळवण्यात देखील आला. या सामन्यात पाकिस्तानने नेपाळचा धुव्वा पराभव केला. मात्र चाहत्यांना उत्सुकता आहे ती, 2 सप्टेंबर रोजी होणाऱ्या भारत-पाकिस्तान ( India – Pakistan ) सामन्याची. शनिवारी श्रीलंकेमध्ये हा हायव्होल्टेज सामना रंगणार आहे. अशातच टीम इंडियाच्या ( Team India ) खेळाडूंचं डाएट समोर आलं आहे. पाहूया पाकिस्तानशी दोन हात करण्यापूर्वी टीम इंडियाच्या ( Team India ) खेळाडूंचा आहार कसा असणार आहे. 

प्री मॅच डाएट

खेळाडूंच्या डाएटमध्ये प्री मॅच डाएट ( Pre Match Diet ) हा एक प्रकार असतो. ज्यामध्ये काही खेळाडू सामन्यापूर्वी हाय कार्ब्स ( High Carbs ) फूड खातात. ज्यामध्ये अधिकतर केळ्याचा समावेश असतो. किंवा काही खेळाडू ज्यामध्ये कार्ब्स ( Carbs ) जास्त असतात अशी फळं खातात.

पोस्ट मॅच

सामन्या दरम्यान असो किंवा सामन्यानंतर असो खेळाडूंना एनर्जी ही गरजेची असते. अशा वेळी सामन्यानंतर एनर्जी मिळावी म्हणून खेळाडू चिकन सोबत ब्राऊन राईस ( Brown Rice ) खाण्यास प्राधान्य देतात.

Related News

हायड्रेशन

खेळताना खेळाडूला शरीर हायड्रेट ( Hydrate ) ठेवणं फार गरजेचं असतं. यावेळी पाणी पिण्यासोबतच ते एनर्जी ड्रिंक सुद्धा पितात. 

स्नॅक्स

अनेकदा प्रश्न पडतो की, खेळाडू स्नॅक्स म्हणून काय खात असतील. यावेळी खेळाडू स्नॅक्समध्ये मुसळी बार, ताजी फळं तसंच नट्स खातात. मात्र अनेकदा स्लो डायजेशनमुळे नट्स अधिक प्रमाणात खाल्ले जात नाहीत. 

बॅलन्स डाएट

खेळाडूंच्या डाएटमध्ये कार्ब्स, प्रोटीन आणि फायबर यांचा समावेश असतो. तर काही खेळाडू त्यांच्या घरी बनवलेलं खाणं खातात. Information Source / Image Credits

Related News

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *