Mohammed Shami ला म्हणायचं काय? वर्ल्ड कपनंतर खळबळजनक खुलासा, म्हणतो ‘मला सांगितलं होतं पहिल्या मॅचपासून…’

Mohammed Shami On Indian Team Management : मोहम्मद शमी नावाच्या वादळात वर्ल्ड कपमधील अनेक खेळाडू बेपत्ता झाले होते. 7 सामन्यात 24 विकेट घेऊन मोहम्मद शमीने वर्ल्ड कपमध्ये (World Cup 2023) धुरळा उडवला होता. त्याचबरोबर शमीने (Mohammed Shami) यंदाच्या वर्ल्ड कपमध्ये अनेक रेकॉर्ड देखील मोडीस काढले आहेत. शमीला यंदाच्या वर्ल्ड कपमधील पहिल्या 4 सामन्यात संधी मिळाली नव्हती. अशातच आता याच मुद्द्यावरून मोहम्मद शमीने मोठा खुलासा केला आहे. 

काय म्हणाला Mohammed Shami ?

वर्ल्ड कप (World Cup 2023) सुरू होण्यापूर्वी मला सांगण्यात आलं होतं की, मी पहिल्या सामन्यापासून खेळणार आहे. पण मला पहिल्या तीन आणि त्यानंतर चौथ्या सामन्यात देखील संधी मिळाली नाही. तेव्हा मला वाटलं की काहीतरी गडबड आहे, असा खुलासा शमीने केला आहे. जेव्हा मी संघ पाहतो तेव्हा असं वाटतं की प्रत्येकजण चांगली कामगिरी करतोय. या काळात तुम्हाला मानसिकदृष्ट्या खंबीर राहावं लागतं. तुमच्या मनावर नियंत्रण ठेवावं लागेल, असं शमीने म्हटलं आहे.

मी खेड्यातील माणूस आहे आणि म्हणून मी माझी पार्श्वभूमी लक्षात ठेवतो. मी कधीच पिच पाहायला जात नाही, पिच पाहून त्याचा दबाव का घ्यायचा? असा सवाल देखील मोहम्मद शमीने विचारला आहे. त्यावेळी शमीने त्याची बालपणीची आठवण देखील सांगितली. लहानपणी मला आश्चर्य वाटायचं की, लोक भर उन्हात क्रिकेट का खेळतात? मी निवांत मी आंब्याच्या बागेत आंबे खात बसून मॅच बघायचो, असं म्हणत त्याने आठवणींना उजाळा दिला आहे.

Related News

प्यूमा इंडियाशी बोलताना शमीने 2015 च्या वर्ल्ड कपची आठवण देखील सांगितली. 2015 च्या वर्ल्ड कपपूर्वी माझ्या गुडघ्याला सूज आली होती. त्यावेळी माझ्याकडे फक्त 2 पर्याय होते. एक म्हणजे मी जाऊन वर्ल्ड कप सोडून शस्त्रक्रिया करावी आणि दुसरं म्हणजे वर्ल्ड कप खेळावा. मी दुसरा पर्याय निवडला. देशासाठी खेळण्याची संधी कोण सोडेल का? मी प्रत्येक सामन्यानंतर हॉस्पिटलला जाऊन इंजेक्शन घेत होतो, असा खुलासा शमीने केला आहे.

आणखी वाचा – योगी आदित्यनाथ यांचं मोहम्मद शमीला खास गिफ्ट, वर्ल्ड कप फायनलआधीच केली घोषणा!

दरम्यान, सेमीफायनलमध्ये न्यूझीलंडविरुद्ध 7 विकेट घेत शमीने इतिहास रचला. एकदिवसीय क्रिकेटमध्ये 7 विकेट घेणारा तो एकमेव भारतीय खेळाडू आहे. वर्ल्ड कपच्या इतिहासात 50 विकेट पूर्ण करणारा खेळाडू म्हणजे मोहम्मद शमी… 2015 चा वर्ल्ड कप असो वा 2019 चा वर्ल्ड कप… तिन्ही वर्ल्ड कपमध्ये शमीने अद्वितिय बॉलिंग केलीये. आयपीएलमध्ये पर्पल कॅप पटकवणारे अनेक असतील. पण देशासाठी विकेट्स खोलणारा एकच होता.. मोहम्मद शमी…!Information Source / Image Credits

Related News

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *