- Marathi News
- Sports
- India Squad T20 Odi Test Team Performance Analysis; Team India T20 Success Rate | Rohit Virat
क्रीडा डेस्क36 मिनिटांपूर्वी
- कॉपी लिंक
टीम इंडिया विंडिजमध्ये रोहित शर्मा आणि विराट कोहलीशिवाय एकदिवसीय आणि टी-20 सामने खेळत आहे. त्यात 5 पैकी 3 सामने गमावले संघाने गमावले आहेत. यामध्ये 2 टी-20 आणि एका वनडेचा समावेश होता. संघ व्यवस्थापनाने म्हटले की, ते प्रयोग करत आहेत यामुळे अनेक युवा खेळाडूंना संधी मिळेल.
मुख्य प्रशिक्षक राहुल द्रविडनेही प्रयोगाच्या रणनीतीचा बचाव केला. पण पण टीम इंडिया खरंच 36 वर्षीय रोहित आणि 34 वर्षीय विराटशिवाय खेळण्यास सज्ज आहे का? या प्रश्नाचे उत्तर जाणून घेऊ.
सुरुवात T20 पासून …
202 पैकी 167 सामन्यांत दोघांपैकी एक होताच
भारताने 2006 मध्ये आंतरराष्ट्रीय टी-20 खेळण्यास सुरुवात केली. रोहित शर्माने सप्टेंबर 2007 मध्ये आणि विराटने 2010 मध्ये T20 मध्ये पदार्पण केले. भारताने आतापर्यंत 202 टी-20 सामने खेळले आहेत, त्यापैकी 198 या दोघांच्या पदार्पणानंतरचे होते. त्यात 167 वेळा रोहित किंवा विराट पैकी एकजण प्लेइंग-11 चा भाग होता. यातील 109 सामने भारताने जिंकले. म्हणजे विजयाची टक्केवारी 65.27% होती. यामध्ये त्या सामन्यांचाही समावेश आहे जेव्हा दोघेही प्लेइंग-11 मध्ये एकत्र होते.

दोघे खेळले तर संघ 65% सामने जिंकतो
2007 पासून आतापर्यंत टीम इंडियाने या दोघांना प्लेइंग इलेव्हनमध्ये एकत्र ठेवून 96 टी-20 सामने खेळले आहेत. त्यापैकी 63 जिंकले आणि 30 मध्ये पराभूत झाला. म्हणजे विजयाची टक्केवारी सुमारे 65% होती. दोन्ही आणि एक खेळाडू असल्यास भारत जवळपास सारखेच T20 सामने जिंकतो. 2012 पासून, भारताने या दोन खेळाडूंना एकत्र ठेवून बहुतेक सामने खेळण्यास प्राधान्य दिले.

दोघेही नसताना घसरली विजयाची टक्केवारी
टीम इंडियाने 2007 पासून रोहित आणि विराटशिवाय 31 टी-20 सामने खेळले आहेत. त्यापैकी 18 मध्ये संघ जिंकला आणि 11 मध्ये पराभूत झाला. एक सामना बरोबरीत तर एक अनिर्णितही राहिला. संघाची विजयाची टक्केवारी जवळपास 58% पर्यंत पोहोचली, ती एक किंवा दोघे खेळताना असलेल्या टक्केवारीपेक्षा 7% कमी होती.
एवढेच नाही तर 2011 ते 2018 पर्यंत संघाने त्यांच्याशिवाय फक्त 6 टी-20 सामने खेळले. त्यापैकी 5 सामने झिम्बाब्वे विरुद्ध आणि एक अफगाणिस्तान विरुद्ध होता, त्यात 2 मध्ये संघाला पराभवाला सामोरे जावे लागले होते. म्हणजेच टीम इंडियाने 2011 ते 2018 या काळात दोन्ही खेळाडूंशिवाय टी-20 खेळले नाही.

आता कसोटीची कामगिरी पाहू..
124 पैकी 113 कसोटीत एक जण तरी खेळला
विराट कोहलीने 20 जून 2011 रोजी पदार्पण केले, तर रोहित शर्माने नोव्हेंबर 2013 मध्ये कसोटी पदार्पण केले. पदार्पण केल्यापासून, भारताने 124 कसोटी सामने खेळले आहेत, त्यापैकी दोन खेळाडूंपैकी एकतरी 113 सामन्यांमध्ये प्लेइंग-11 चा भाग होता. त्यापैकी टीम इंडिया 59 मध्ये जिंकली, 32 मध्ये पराभूत झाली आणि 22 सामने अनिर्णित राहिले. म्हणजेच, संघ फक्त 28% सामने हरला. 113 पैकी विराट कोहली 111 कसोटीत प्लेइंग-11 चा भाग होता.

दोघांनी एकत्र 50 कसोटी खेळल्या, विजयाची टक्केवारी वाढली
रोहित शर्माने 2021 मध्ये कसोटी संघात स्थान निश्चित केले, 2022 मध्ये त्याला कसोटी संघाचे कर्णधारपद मिळाले. म्हणूनच 2013 मध्ये पदार्पण करूनही तो केवळ 52 कसोटी खेळला. पण 50 कसोटीत विराटही त्याच्यासोबत होता. यापैकी 28 वेळा भारताने विजय मिळवला आणि केवळ 13 वेळा पराभव पत्करला. 9 कसोटी अनिर्णित राहिल्या, म्हणजेच संघाने 56% सामने जिंकले आणि केवळ 18% वेळा संघाचा पराभव झाला.

दोघांशिवाय फक्त 11 कसोटी
जून 2011 पासून भारताने रोहित आणि विराटशिवाय केवळ 11 कसोटी सामने खेळले. 5 मध्ये संघ जिंकला आणि 5 मध्येच हरला, तर एक कसोटीही अनिर्णित राहिली. संघाची विजयी टक्केवारी 45% च्या जवळ होती. ती एक किंवा दोघे खेळताना असलेल्या तुलनेत कमी होती. या काळात संघाने जवळपास 45% सामने गमावले.
2018 पर्यंत या दोघांशिवाय भारत फक्त 8 कसोटी खेळला. त्यात 2011 मध्ये इंग्लंड विरुद्ध 4 आणि वेस्ट इंडिज विरुद्ध 2 कसोटी सामील आहेत. इंग्लंडमध्ये संघाने सर्व सामने गमावले, तर वेस्ट इंडिजमध्ये त्यांनी सर्व सामने जिंकले. या संघाने भारतात ऑस्ट्रेलिया आणि अफगाणिस्तानविरुद्ध प्रत्येकी एक कसोटीही खेळली होती, या दोन्ही कसोटी संघाने जिंकल्या होत्या.

आता शेवटी वन डे तील कामगिरी…
384 पैकी 324 वन डे सामने खेळले
रोहित शर्माने 23 जून 2007 रोजी वनडे क्रिकेटमध्ये पदार्पण केले. ऑगस्ट 2008 मध्ये विराटने एकदिवसीय क्रिकेटमध्ये पदार्पण केले. त्यांच्या पदार्पणानंतर भारताने 384 एकदिवसीय सामने खेळले, 324 मध्ये दोन खेळाडूंपैकी एक प्लेइंग-11 चा भाग होता. त्यापैकी 196 मध्ये संघ जिंकला आणि 112 मध्ये पराभूत झाला. म्हणजे विजयाची टक्केवारी सुमारे 60% होती.

दोघे सोबत खेळल्यानंतरही टक्केवारी 60% च्या जवळपास
195 एकदिवसीय सामन्यांमध्ये रोहित आणि विराट दोघेही प्लेइंग-11 चा भाग होते. संघ 120 मध्ये जिंकला आणि फक्त 68 मध्ये पराभूत झाला. म्हणजे विजयाची टक्केवारी सुमारे 61% होती. यापैकी एक असला तरीही भारत 60% सामने जिंकतो. म्हणजेच भारताच्या विजयाची शक्यता वाढवण्यासाठी दोघांपैकी एकाचे प्लेइंग-11 मध्ये असणे आवश्यक आहे.

दोघांशिवाय फक्त 60 सामने
एप्रिल 2007 पासून भारताने रोहित आणि विराटशिवाय केवळ 60 सामने खेळले. यापैकी, संघ 39 मध्ये जिंकला, म्हणजेच विजयाची टक्केवारी 65% होती. परंतु संघाने 60 पैकी 26 सामने झिम्बाब्वे, स्कॉटलंड, वेस्ट इंडिज, श्रीलंका आणि अफगाणिस्तान यांसारख्या संघांविरुद्ध खेळले, जे मॉडर्न डे एकदिवसीय क्रिकेटमध्ये मजबूत मानले जात नाहीत.
भारताने रोहित आणि विराटशिवाय 22 एकदिवसीय सामने ऑस्ट्रेलिया, इंग्लंड आणि पाकिस्तान सारख्या आघाडीच्या संघांविरुद्ध खेळले, परंतु ते सर्व 2009 पूर्वी. म्हणजेच गेल्या 14 वर्षांत अव्वल संघांविरुद्ध टीम इंडियाने या दोन खेळाडूंशिवाय मैदानात उतरण्याची हिंमतही केलेली नाही.
संघाने न्यूझीलंडविरुद्ध 7 वनडे आणि दक्षिण आफ्रिकेविरुद्ध 5 सामने खेळले. पण न्यूझीलंडविरुद्धचे बहुतेक सामने 2011 पूर्वी, तर दक्षिण आफ्रिकेचे सामने 2019 नंतर झाले. यादरम्यान, दोन्ही संघ इतर आघाडीच्या संघांच्या तुलनेत खूपच कमकुवत होते.

दोघांशिवाय का तयार राहावे लागेल?
रोहित शर्मा (36) आणि विराट कोहली (34) हे संघाचे वरिष्ठ खेळाडू बनले आहेत. रोहित 16 तर कोहली 15 वर्षांपासून भारताकडून क्रिकेट खेळत आहे. दोघांनीही कारकिर्दीचे शिखर जवळपास ओलांडले आहे आणि 2 ते 4 वर्षात आंतरराष्ट्रीय क्रिकेटला अलविदा करू शकतात.
या दरम्यान दोघे निवृत्त झाले नाही तरी, संघाला त्यांच्याशिवाय खेळायला शिकावे लागेल. कारण सचिन तेंडुलकर, वीरेंद्र सेहवाग आणि राहुल द्रविड यांसारखे ज्येष्ठ खेळाडू त्यांच्या शेवटच्या टप्प्यात असताना रोहित आणि विराटनेही टीम इंडियात स्थान पक्के केले होते.
2023 नंतर दोघांशिवाय खेळायला सुरुवात करावी लागेल
टीम इंडियाला रोहित शर्मा आणि विराट कोहलीची टी-20, वनडे आणि टेस्ट या दोन्ही फॉरमॅटमध्ये गरज आहे.
- त्यांच्याशिवाय टी-२० फॉरमॅटमध्ये खेळायला सुरुवात केली आहे. संघाने नवीन खेळाडूंवर विश्वास दाखवत राहिल्यास 2024 टी-20 विश्वचषकानंतर त्यांच्यावरील अवलंबित्वही कमी होईल.
- एकदिवसीय सामन्यांमध्ये टीम इंडियाने रोहित आणि विराटशिवाय काही सामने नक्कीच खेळले आहेत, परंतु संघ अजूनही दोघांवर अवलंबून आहे. जर संघाला त्यांच्यावरील अवलंबित्व कमी करायचे असेल तर 2023 च्या विश्वचषकानंतर त्यांना दोन्ही खेळाडूंशिवाय खेळायला सुरुवात करावी लागेल. म्हणजे संघ 2025 च्या चॅम्पियन्स ट्रॉफी आणि 2027 च्या एकदिवसीय विश्वचषकासाठी देखील त्यांच्याशिवाय सज्ज होईल. .
- कसोटी क्रिकेटमध्ये टीम इंडियाला रोहित आणि विराटशिवाय कोणताही सामना खेळायला आवडत नाही. पण 2-3 वर्षांत भारताला या दोघांचाही पर्याय शोधावा लागणार आहे, कारण त्यांच्या जाण्याने संघात मोठी पोकळी निर्माण होईल, ती भरून काढणे कठीण होईल.