बबनराव घोलप यांची निष्ठा तेव्हा कुठे गेली होती?: छगन भुजबळ यांचा घणाघात; मराठा आरक्षणाचा प्रश्न आंदोलन, दगडफेकीने सुटणार नाही

मुंबई32 मिनिटांपूर्वी

  • कॉपी लिंक

1991 मध्ये शिवसेनेतून काँग्रेसमध्ये प्रवेश करण्यासाठी 36 आमदारांनी स्वाक्षऱ्या केल्या होत्या. त्या यादीत शिवसेनेचे उपनेते बबनराव घोलप यांची स्वाक्षरी सर्वात वर होती. त्यामुळे तेव्हा त्यांची निष्ठा कुठे गेली होती? असा सवाल राज्याचे अन्न व नागरी पुरवठा मंत्री छगन भुजबळ यांनी घोलपांवर निशाणा साधताना केली आहे.

Related News

बबनराव घोलप यांनी काही दिवसांपूर्वी छगन भुजबळ यांच्यावर टीका केली होती. भुजबळ वर्षापूर्वीच शिवसेनेत प्रवेश करणार होते. मात्र, दिल्लीतून मुंबईला येऊन त्यांचा शिवसेना प्रवेश रोखला गेला, असा दावा घोलप यांनी केला होता. तसेच त्यांच्या निष्ठेवरही सवाल उपस्थित केला होता. याविषयी छगन भुजबळ यांना छेडले असता त्यांनी मी किंवा माझ्या कुटुंबीयांनी शिवसेना प्रवेशावर केव्हाच भाष्य केले नसल्याचे स्पष्ट केले. ही कार्यकर्त्यांमधील चर्चा असू शकते. आमच्या निष्ठेवर टीका करणाऱ्या घोलप यांनी 1991 मध्ये काँग्रेसमध्ये प्रवेशाची तयारी केली होती. त्यामुळे त्यांनी आम्हाला निष्ठा शिकवू नये, असे ते म्हणाले.

मराठ्यांना आरक्षण देण्याची जुनी मागणी

विद्यमान उपमुख्यमंत्री तथा तत्कालीन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केलेल्या कायद्यात 12 ते 13 टक्के तरतूद मान्य केली होती. पण, सर्वोच्च न्यायालयात अडचण निर्माण झाली. मराठा समाजाला आरक्षण देण्याची आमची जुनी मागणी आहे. पण, हे आरक्षण देताना अन्य समाजाच्या आरक्षणाला धक्का लागू नये, अशी आमची भूमिका आहे, असेही भुजबळ यावेळी म्हणाले.

प्रश्न आंदोलन, दगडफेकीने सुटणार नाही

मराठा समाजाला आरक्षण देणे ही सर्वपक्षीयांची भूमिका आहे. आत्महत्या, दगडफेक व आंदोलने करून हा प्रश्न सुटणार नाही. या प्रश्नावर चर्चेतून तोडगा निघू शकतो. सध्या सण-उत्सवाचे दिवस असल्यामुळे मराठा समाजाने आंदोलने थांबवावीत, अशी विनंतीही छगन भुजबळ यांनी यावेळी केली.

Information Source / Image Credits

Related News

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *