टीम इंडियासोबत सेलिब्रेशन करणारा तो मिस्ट्रीमॅन कोण, रोहितने सरळ त्याच्याच हाती का दिली ट्रॉफी?

Rohit Sharma : एशिया कपच्या फायनलमध्ये टीम इंडियाने गतविजेच्या श्रीलंकेच्या टीमचा दारूण पराभव केला. हा सामना जिंकून टीम इंडियाने आठव्यांदा एसिया कपच्या ट्रॉफीवर भारताचं नाव कोरलं. या दणदणीत विजयानंतर नियमांनुसार, ट्रॉफी देण्यासाठी टीम इंडियाचा कर्णधार रोहित शर्माला बोलवण्यात आलं. यावेळी रोहितने ट्रॉफी घेतली आणि तो टीमकडे आला. मात्र यावेळी एक वेगळी घटना घडली आणि ज्याचा व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होतोय. टीमकडे येताच रोहित शर्माने विजेती ट्रॉफी मॅच विनरकडे न देता एका अनोळखी व्यक्तीकडे सोपवली.  

‘या’ व्यक्तीच्या हाती दिली रोहितने ट्रॉफी

एशिया कप जिंकल्यानंतर सोशल मीडियावर एक व्हिडीओ व्हायरल होताना दिसतोय. ज्यामध्ये टीम इंडियाचा कर्णधार रोहित शर्मा अचानक एका अनोळखी व्यक्तीच्या हाती एशिया कपची ट्रॉफी देताना दिसतोय. दरम्यान हा व्यक्ती नेमका कोण आहे, हा प्रश्न सर्वांच्या मनात आहे.  

यापूर्वी रोहितने विजेती ट्रॉफी टीमच्या युवा खेळाडूंना दिली. यामध्ये इशान किशन आणि तिलक वर्मा यांच्याकडे ही ट्रॉफी दिसतेय. मात्र जेव्हा टीम इंडिया सेलिब्रेशन करण्यासाठी एकत्र येतात, तेव्हा ही ट्रॉफी एका अनोळखी व्यक्तीच्या हाती दिसतेय. 

Related News

कोण आहे हा मिस्ट्री मॅन?

आशियाई चॅम्पियन टीम इंडिया ट्रॉफीसह सेलिब्रेशन करत होती, तेव्हा रोहित शर्माने स्टेजच्या मध्यभागी या व्यक्तीला बोलावलं आणि त्याला ट्रॉफीही देण्यात आली. हा व्यक्ती कोण? हाच प्रश्न तुमच्या मनात आला असेल. मात्र ती व्यक्ती दुसरी कोणी नसून टीम इंडियाचा थ्रोडाउन एक्स्पर्ट राघवेंद्र उर्फ ​​रघु होता.

रघू हा टीम इंडियातील एक महत्त्वाचा भाग मानला जात असून तो अनेक वर्षांपासून टीमसोबत आहे. 2011-12 च्या ऑस्ट्रेलिया दौऱ्यात थ्रोडाउन स्पेशालिस्ट म्हणून प्रथम भाग घेतला होता. 2014 च्या इंग्लंड दौऱ्यासाठी तो भारतीय टीमच्या सपोर्ट स्टाफमध्ये होता. तेव्हापासून तो टीम इंडियाच्या स्टाफचा एक भाग आहे. माजी खेळाडू सचिन तेंडुलकर आणि राहुल द्रविड यांच्या शिफारशीवरून त्याला ‘थ्रोडाऊन स्पेशालिस्ट’ म्हणून संघात समाविष्ट कऱण्यात आलं होतं.Information Source / Image Credits

Related News

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *