नार्वेकर आणि फाटक एकनाथ शिंदेंना का भेटले? सुनील प्रभूंचं सोपं उत्तर, दिवसभरात आज काय घडलं?

मुंबई शिवसेना आमदार अपात्रता सुनावणीस (Shiv Sena MLA Disqualification) आज सुरुवात झाली. आजच्या कामकाजात शिवसेना ठाकरे (Shiv Sena UBT) आणि शिंदे गटाच्या (Shiv Sena Shinde Faction) वकिलांमध्ये खडाजंगी झाली. शिंदे गटाचे वकील अॅड. महेश जेठमलानी (Mahesh Jethmalani) यांनी दिवसभराच्या सुनावणीत ठाकरे गटाचे विधीमंडळ व्हीप सुनील प्रभू (Sunil Prabhu) यांची साक्ष नोंदवली. जेठमलानी यांनी प्रभूंना अडचणीचे प्रश्न विचारले. मात्र, प्रभू यांनी संयमी उत्तरे दिली. आमदार अपात्रता सुनावणी, 22 नोव्हेंबर, बुधवारी सकाळी 11 वाजता होणार आहे. 

 

Related News

सभागृहात आजच्या सुनावणीत नेमकं काय झाले? 

जेठमलानी : प्रभू तुम्ही या अपात्रता याचिका इंग्रजीत दाखल केल्यात का? 

प्रभू : मी याचिका दाखल केलीय, मराठीत‌ माझ्या वकिलाला सांगितलं, त्यांनी इंग्रजीत ड्राफ्ट करुन दिलंय.

जेठमलानी : आपण अपात्रता याचिकांत कुठेही म्हटले नाहीकी तुम्ही जे सांगितले आहे, ते मराठीत तुम्हाला सांगितले आहे.

प्रभू : मी जसे काही म्हटले आहे ते रेकॉर्डवर आहे. (मराठीमध्ये प्रश्न विचारण्याची प्रभू यांची मागणी)

अध्यक्ष : पिटीशन ड्राफ्ट करताना ते आपल्याला मराठीत समजवण्यात आलं आहे अस कुठे ही म्हटल नाही यावर प्रभु तुमचं मत काय आहे?

प्रभू :  मला जेव्हा समजल तेव्हाच मी सही केली असे म्हटलं आहे. 

अध्यक्ष :  (शिंदे गटाच्या वकिलांनी विचारलेला प्रश्न मराठीत अध्यक्ष सांगताना) तुम्हाला इंग्रजी वाचता येत का आणि ते समजत का?

प्रभू :  मला इंग्रजी भाषा वाचता येते आणि समजते. मात्र मला माझ्या भाषेत समजते. त्या संदर्भात मी कांन्फडन्ट आहे.

जेठमलानी : अपात्रता याचिका सही करण्याच्या आधी तुमच्या वकिलाने इंग्रजीत वाचून दाखवली होती का?

प्रभू:  मला वाचून दाखवल्यानंतर मी शब्दशा त्याचा अर्थ मराठीत समजून घेतला.

जेठमलानी : तुम्हाला कोणत्या वकिलांनी अपात्रता याचिकेतील मुद्दे मराठीत समजवले.

प्रभू : असिम सरोदे यांनी समजवले.

जेठमलानी : तुम्ही या व्यासपीठासमोर जे प्रतिज्ञापत्र इंग्रजी भाषेत सादर केले आहे. 18 नोव्हेंबर २०२३ रोजी तुम्ही जे शपथपत्र सादर केले, ते सुद्धा इंग्रजीत आहे हे सत्य आहे का?

प्रभू :  हो खरं आहे ते रेकॉर्डवर आहे.

जेठमलानी : आपल्या शपथपत्रात कुठेही उल्लेख नाही की ते आपल्याला मराठीत समजवण्यात आलं नव्हतं.

प्रभू : ते ऑन रेकाॅर्ड आहे.

जेठमलानी : प्रतिज्ञापत्रावरील मुद्दे न समजून घेत आपण सही केली आहे का? 

प्रभू : असे कसे शक्य आहे? विधीमंडळाचा मी सदस्य आहे. मी लोकांचं प्रतिनिधित्व करतो त्यामुळे मी समजून घेतल्याशिवाय कशी सही करणार नाही. मी अशीक्षित नाही.  माझ्या भाषेत मला समजत म्हणून मी माझ्या भाषेत समजून घेऊन त्यानंतर मी सही केली आहे. 

ठाकरे गटाच्या वकिलांचा आक्षेप घेत असे प्रश्न विचारु नयेत असे म्हटले

जेठमलानी : तसे नाही चालणार मी विचारणार 

जेठमलानी : 2019 च्या निवडणुकीत भाजपच्या युतीत आपण निवडणूक लढवली होती का?

प्रभू : मला शिवसेना माझ्या पक्षाने एबी फॉर्म दिला आहे. त्यावर मी निवडणूक लढलो. शिवसेना पक्षाच्या चिन्हावर मी निवडणूक लढलो.

कामत (ठाकरे गटाचे वकील ) : हे प्रश्न गैर आहेत. जे सर्वांना माहिती आहे ते प्रश्न उलट तपासणीत का विचारत आहे? वेळ वाया घालवत आहेत. 

जेठमलानी: शिवसेना पक्षाने आपल्याला उमेदवारी दिली त्यापूर्वी भाजपसोबत युती केली होती हे सत्य आहे का? 

प्रभू : हो सत्य आहे.

जेठमलानी : तुम्ही निवडणूक लढवताना विरोधात असणाऱ्या काँग्रेस तसेच इतर पक्षांवर आरोप प्रत्यारोप केले हल्ले होते का? 

प्रभू : मी विकासाची काम केली होती. त्याच कामांच्या आधारे मी जनतेकडे मत मागितली.  त्यामुळे कोणावर टीका करायची माझ्यावर वेळ आली नाही.

जेठमलानी : राष्ट्रवादी काँग्रेस किंवा त्यांच्या नेत्यांवर आपण निशाणा साधलाच  नाही असो आहे का?

प्रभू :  मी विकासाच्या मुद्यावर प्रचार केला त्यामुळे माझ्या विरोधात असलेल्या उमेदवारावर बोलण्याची वेळच आली नाही. 

जेठमलानी : आपण किंवा आपल्या पार्टीने राष्ट्रवादी किंवा काँग्रेसच्या नेत्यांवर शाब्दिक हल्ला केला का? 

प्रभू: मी माझ्या मतदार संघात विकासाच्या मुद्यावर प्रचार केला. मागील पाच वर्षात काय केल? आणि पुढे काय करणार यावर प्रचार केला. त्यामुळे मला माझ्या विरोधी उमेदवारावर टीका करण्याची वेळच आली नाही. 

जेठमलानी : निवडणूक प्रचारात भाजप आणि शिवसेना सरकारने जी विकास कामे केली त्याचा उल्लेख केला का?

प्रभू : मी माझ्या मतदारसंघात मी केलेल्या विकास कामांचा उल्लेख केला.

जेठमलानी : प्रचारात मोदी, शहा आणि फडणवीस यांचा फोटो पोस्टरवरती फोटो वापरला का?

प्रभू : मला या संदर्भात फार आठवत नाही. मात्र पक्षप्रमुख म्हणून उद्धव ठाकरे यांचा फोटो होता.

जेठमलानी : प्रभू तुम्ही 2019 च्या निवडणूक प्रचारात अनेक पोस्टर छापले. त्यात पीएम मोदी , शाहा , फडणवीस या नेत्यांची पोस्टर वापरले हे खरे आहे का? 

प्रभू : पोस्टरवर काय छापले मला आठवत नाही. युती होती. माझ्या पोस्टरवर सेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे, उद्धव ठाकरे यांचे पोस्टर मात्र नक्की होते.

दुपारी जेवणाच्या सुट्टीनंतर शिवसेना आमदार अपात्रता प्रकरणी सुनावणी सुरू करण्यात आली. सुनिल प्रभू यांची फेरसाक्ष सुरू ठेवण्यात आली. यावेळी विटनेस बॉक्स ठेवण्यात आला आहे. सुनील प्रभू यांना व्हिटनेस बॉक्स मध्ये बसवण्यात आले. याआधी प्रभू हे त्यांच्या वकिलांशेजारी बसले होते. या आसनव्यवस्थेला शिंदे गटाच्या वकिलांनी आक्षेप घेतला होता. त्यानंतर ही वेगळी व्यवस्था करण्यात आली. 

महेश जेठमलानी : आपण याचिकेच्या दुसरा परिच्छेद मध्ये भाजप आणि इतर भ्रष्ट, इतर हेतुने चुकीचा प्रभाव व इतर बेकायदेशीर माध्यमातून करत होते असा आपण आरोप केला हा कशाच्या आधारावर केला आहे

सुनील प्रभु :  2019 मध्ये शिवसेना, राष्ट्रवादी आणि कांग्रेस यांचं सरकार स्थापन केले. त्यावेळी प्रतिवादी आमच्या सोबत मंत्री होते. त्यानंतर हे सुरत मार्गे गुवाहाटीला गेले. त्यावेळी दबावतंत्र आणि चुकीच्या पद्धतीने गेले असे मी म्हटलं आहे.

महेश जेठमलानी : आपण या निष्कर्षापर्यत आला आहात, मात्र आपल्याकडे ठोस पुरावे नाहीत हे बरोबर आहे का?

सुनिल प्रभू : माझ्या पक्षातील आमदार पळवले गेले अशी चर्चा माध्यमात  आणि लोकांमध्ये होती  त्यामुळे मी असं बोललो. 

महेश जेठमलानी : या संदर्भात आपल्याकडे ठोस पुरावा आहे का?याच उत्तर मिळालं नाही म्हणून पुन्हा एकदा विचारले जात आहे की आपल्याकडे पुरावा आहे का?

सुनिल प्रभू : ऑन रेकॉर्ड

महेश जेठमलानी :  आपण निवडून आलेले आमदार ही बाब लक्षात घेता आपण बेजबाबदार वक्तव्य केल आहे. शपथ घेतल्यानंतर ही आपण बेजबाबादार बोलले आहात

सुनिल प्रभू :  या देशाचा मी नागरीक आहे. न्यायव्यवस्था आणि संविधान यावर माझा विश्वास आहे. त्यामुळे मी या देशाचा नागरिक म्हणून खोटं बोलणार नाही. 

महेश जेठमलानी : माझं आपल्याला म्हणणं आहे की प्रश्न क्रमांक 22 मध्ये जे उत्तर दिलं आहे त्यातून असं दर्शवते आहे की संविधान आणि न्यायव्यवस्था संदर्भात कुठलाही मान नाही आहे

सुनिल प्रभू : माझ्या संदर्भात बोलण गैर आहे. मी सामान्य कुटुंबातील आहे आणि विटनेस बॉक्स मध्ये आहे. त्यामुळे मला संविधान आणि  न्यायव्यवस्था या संदर्भात मला आदर आहे. त्यामुळे माझ्या बद्दल अस बोलण गैर आहे. मी या लोकशाहीचा आदर करतो.  डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी लिहिलेल्या घटनेची एवढी ताकत आहे की त्यावर माझा विश्वास आहे. 

शिवसेना ठाकरे गटाचे व्हीप सुनील प्रभू यांनी डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी लिहिलेल्या राज्य घटनेचा उल्लेख केला. पण अध्यक्षांनी तो‌ रेकॉर्डवर न घेतल्यानं ठाकरे गटाचे वकील देवदत्त कामत आक्रमक झाले आहेत. कामत यांच्या भूमिकेनंतर अध्यक्षांनी प्रभू यांना सांगितलं तुम्हाला काही आक्षेप असेल तर मला सांगा. त्यावर कामत यांनी, अध्यक्ष तुम्ही मला चुकीचं ठरवत आहात.  मी साक्षीदाराला भुलवण्याचा‌ प्रयत्न कधी केला नाही. 25 वर्षांच्या कारकिर्दीत ‌मी असं काही केलं नाही असे कामत यांनी म्हटले. 

महेश जेठमलानी : आपण आपल्या अपात्रता याचिकेवरील पान क्रमांक 8 वर जे काही लिहिले आहे त्यात आपण सदर माहिती ती सत्य आहे असं समजता ते रेकॉर्ड दाखवावा किंवा आपल्याकडे आहेत का?

सुनिल प्रभू : जे काही कागदपत्रे आहेत ते मी ऑन रेकॉर्ड ठेवले आहे. 

महेश जेठमलानी : आपण जे शपथपत्र दाखल केले आहे त्यात कोणताही भ्रष्ट संदर्भात आरोप केलेला नाही. याचा अर्थ तुम्ही खोट बोलत आहेत

सुनिल प्रभू : सर्वकाही ऑन रेकॉर्ड आहे

महेश जेठमलानी  : अपात्रता याचिकेत अनुच्छेद दोन मध्ये जे आरोप केले आहेत,  ते आरोप आपण आपल्या 18 नोव्हेंबर 2023 च्या शपथपत्रात उल्लेख केला नाही. कारण अपात्रता याचिकेतील परिच्छेद 2 मधील आरोप खोटे आहेत, याची आपल्याला कल्पना होती. 

सुनिल प्रभू : ज्या मला माहिती होत्या व सत्य होत्या, त्याच गोष्टी मी याचिकेत मांडल्या आहेत. त्यामुळे मी खोटे बोलण्याचा प्रश्नच उद्भवत नाही. 

देवदत्त कामत :  प्रभू जे बोलत आहेत, ते मराठीत रेकॉर्डवर घ्या. ते जे मराठीत बोलत आहेत, ते इंग्रजीत अनुवादित करताना अनेक अडचणी येत असल्याचा आमचा समज आहे. आता मराठीत रेकॉर्ड करून नंतर ते इंग्रजीत अनुवादित करावे. नंतर आम्ही शिंदेंच्या वकिलांसोबत बसून ते फायनल करायला तयार आहोत. 

कामत यांच्या सूचनेवर शिंदे गटाच्या वकिलांनी आक्षेप घेत यावरून नंतर वाद होऊ शकतो. जे काही अनुवादित करायचे आहे ते आत्ताच करावे असे शिंदे गटाच्या वकिलांनी म्हटले. 

जेठमलानी :  अनुच्छेद 3 मध्ये आपण नमूद केले आहे की 23 जून 2022  रोजी एकनाथ शिंदे हे शिवसेना विधीमंडळ गटाच्या संपर्कात नव्हते.  पण 21 जून 2022 रोजी उद्धव ठाकरे यांच्या सांगण्यावरून त्यांचे दोन निकटवर्तीय मिलिंद नार्वेकर आणि रविंद्र फाटक ह्यांनी शिंदेंनी भेट घेतली. शिवसेनेचा अंतर्गत वाद सोडविण्यासाठी ते गेले
तुम्ही सहमत आहात का?

सुनील प्रभू : एकनाथ शिंदे हे संपर्कात नव्हते, हे खरे आहे. पण फाटक आणि नार्वेकर यांनी कोणत्या कारणासाठी भेट घेतली हे मला माहित नाही. 

इतर संबंधित बातमी :

Information Source / Image Credits

Related News

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *