सीरिज जिंकण्याचं टीम इंडियाचं स्वप्न विंडिज तोडणार? रोहित-कोहलीला मैदानात उतरणार… अशी असेल प्लेईंग 11

dia vs West Indies 3rd ODI: भारत आणि वेस्ट इंडिज दरम्यान आज आरपारची लढाई रंगणार आहे. तीन एकदिवसीय सामन्यांच्या मालिकेतील तिसरा आणि निर्णायक सामना आज त्रिनिदादच्या ब्रायन लारा स्टेडिअमवर (Brian Lara Stadium) भारतीय वेळेनुसार संध्याकाळी सात वाजता सुरु होणार आहे. तीन सामन्यांच्या मालिकेतील पहिल्या दोन सामन्यांमध्ये भारत आणि वेस्टइंडिजने (India vs West Indies) प्रत्येकी एक विजय मिळवला आहे. त्यामुळे तिसरा सामना जिंकत मालिका जिंकण्याचा प्रयत्न दोन्ही संघांचा असणार आहे. ही मालिका जिंकत वेस्ट इंडिजविरुद्ध सर्वाधिक एकदिवसीय मालिका जिंकण्याचा विक्रम आणखी मजबूत करण्याचा टीम इंडियाचा (Team India) प्रयत्न असेल. 

भारत आणि वेस्टइंडिज दरम्यान 9 मार्च 1983 दरम्यान पहिल्यांदा द्विपक्षीय एकदिवसीय मालिका खेळवली गेली होती. त्यावेळी विंडिजने भारताला 2-1 ने पराभूत केलं होतं. त्यानंतर 1989 पर्यंत वेस्ट इंडिजने भारताविरुद्ध सलग पाच सीरिज जिंकण्याचा विक्रम केला. 1994 ला भारताने वेस्टइंडिजविरुद्ध एकदिवसीय मालिका जिंकत विंडिजच्या विजयाची परंपरा खंडीत केली. टीम इंडियाने विंडिजचा 4-1 असा पराभप केला. यानंतर भारताच्या विजयाची मालिकाच सुरु झाली. 2012 मध्ये यात वेस्टइंडिजने खंड पाडला. पण त्यानंतर पु्न्हा एकदा भारताने सलग 12 एकदिवसीय मालिका जिंकत विक्रम रचला. एका संघाविरुद्ध सर्वाधिक मालिका जिकण्याचा हा विश्वविक्रम आहे. 

आरपारची लढाई
आता एकदिवसीय मालिकेतील पहिला सामना भारतीय संघाने जिंकला. तर दुसऱ्या सामन्यात कर्णधार रोहित शर्मा आणि विराट कोहली खेळले नाही. या सामन्यात हार्दिक पांड्याला कर्णधारपद देण्यात आलं. पण या सामन्यात युवा खेळाडू फ्लॉप ठरले आणि टीम इंडियाला लाजीरवाण्या पराभवाला सामोरं जावं लागलं. 

Related News

सूर्याला विश्रांती देणार?
दुसऱ्या सामन्यात युवा खेळाडूंना खेळवण्याचा टीम इंडियाचा प्रयोग फारसा यशस्वी ठरला नाही. पण सीरिज जिंकण्यासाठी आता रोहित शर्मा आणि विराट कोहलीला मैदानात उतरावच लागणार आहे. अशात टीम इंडियातून कोणाला बाहेर बसवणार याकडे लक्ष लागलं आहे. मध्यल्याफळीत सातत्याने फ्लॉप ठरणाऱ्या सूर्यकुमार यादवला संघातून बाहेर बसवलं जाऊ शकतं. तर संजू सॅमसमला आणखी एक संधी मिळू शकते. गोलंदाजीत फिरकी गोलंदाज युजवेंद्र चहललाही बाहेर बसावं लागण्याची शक्यता आहे. सलामीचा शुभमन गिलही आपली छाप उमटवू शकलेला नाही. गिलला पहिल्या दोन सामन्यात मोठी खेळी करता आलेली नाही. हार्दिक पांड्या बॉलिंगमध्ये यशस्वी ठरतोय, पण बॉलिंगमध्ये फ्लॉप ठरतोय. तर वेगवान गोलंदाज उमरान मलिकही आतापर्यंत एक विकेट घेण्यात यशस्वी ठरलेला नााही. 

भारत-वेस्टइंडिज हेड टू हेड
एकूण एकदिवसीय मालिका : 23
भारत विजयी: 15
वेस्टइंडीज विजयी : 8

भारत-विंडीज एकदिवसीय सामने हेड-टु-हेड
एकूण एकदिवसीय सामने : 141
भारत विजयी : 71
वेस्टइंडीज विजयी : 64
टाय : 2
निकाल नाही : 4

भारताची संभाव्य प्लेईंग 11
रोहित शर्मा (कर्णधार), शुभमन गिल, विराट कोहली, ईशान किशन (विकेटकीपर), हार्दिक पंड्या, सूर्यकुमार यादव/संजू सॅमसन, रवींद्र जडेजा, शार्दुल ठाकुर, कुलदीप यादव, उमरान मलिक, मुकेश कुमार.

वेस्ट इंडिजची संभाव्य प्लेईंग 11
ब्रँडन किंग, काइल मेयर्स, एलिक अथानाज, शाई होप (विकेटकीपर/कर्णधार), शिमरॉन हेटमायर, कीसी कार्टी, रोमारियो शेफर्ड, यानिक कारिया, गुडाकेश मोती, अल्जारी जोसेफ आणि जेडन सील्स.Information Source / Image Credits

Related News

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *