World Cup 2023 Final : …अन् इथंच निसटली मॅच! पाहा टीम इंडियाची पराभावाची 5 प्रमुख कारणं

Why India Defeat in world cup Final : वर्ल्ड कपच्या फायनलमध्ये टीम इंडियाचा ऑस्ट्रेलियाकडून पराभव झाला अन् भारतीय संघाचं तिसऱ्यांदा विश्वविजेते होण्याचं स्वप्न भंगलं. वर्ल्ड कप विजयापासून एक पाऊल दूर असताना ऑस्ट्रेलियाने चिवड झुंज दिली अन् टीम इंडियाच्या स्वप्नांचा चुराडा केला. टीम इंडियाने संपूर्ण वर्ल्ड कपमध्ये दमदार कामगिरी केली. मात्र, फायनलमध्ये टीम इंडियाने अशी काय चूक केली? टीम इंडियाच्या पराभवाची कारणं कोणती? ते पाहुया….

टॉस हरला अन् प्रेशर घेतलं

टीम इंडियाने वर्ल्ड कपच्या सर्व 10 सामने कोणत्याही प्रेशरशिवाय जिंकल्या. मात्र, ऑस्ट्रेलियाविरुद्ध भारतीय वाघ दब्यात खेळताना दिसून आले. एवढा मोठा क्राऊड असताना फायनलचं प्रेशर ऑस्ट्रेलियाकडे नव्हे तर इंडियावर असल्याचं पहायला मिळालं. त्याच टीम इंडियाने टॉस हरला. खेळपट्टीचा अंदाज घेऊन पॅट कमिन्सने योग्य निर्णय घेतला. त्याचा फायदा त्यांना ऑस्ट्रेलियाच्या गोलंदाजीदरम्यान आणि भारताच्या फलंदाजीवेळी देखील झाल्याचं देखील दिसून आलं. 

शुभमनचा खराब परफॉर्मन्स

नुसता नावाचा असलेला प्रिन्स प्रमुख सामन्यात बिथरलेला दिसला. फलंदाजी करताना चूक केलीच पण फिल्डिंगमध्ये देखील शुभमन गिल नापास ठरलाय. रोहित एक बाजू लावून धरत असताना शुभमन एक साधा कॅच हातात देऊन बसला. तर फिल्डिंग करताना अनेक चूका शुभमनकडून झाल्या. जिथं कांगारूंनी एक एक रन वाचवला तिथं टीम इंडियाचे फिल्डर्स ग्राऊंड मोकळं सोडत होते.

Related News

सूर्यकुमार आणि जड्डूचा फ्लॉप शो

विराट कोहली आणि केएल राहुल मैदानात होते, तेव्हा टीम इंडियाचा रननेट 6 च्या खाली आला होता. फोर आणि सिक्सचा दुष्काळ भारतीय खेळाडूंच्या फलंदाजीमध्ये पहायला मिळाला. त्याला कारण फायनलचं प्रेशर… हेच प्रेशर घेऊन रविंद्र जडेजा आणि सुर्यकुमार यादव खेळत होते. जिथं सामना फिरवण्याची संधी होती, तिथं जड्डूने 22 बॉल 9 रन केले, तर आयपीएल स्टार सूर्याने 28 बॉल 18…

ट्रेविस हेड आणि मार्नस लाबुशेन

सामन्यात एक वेळ अशी होती की, ऑस्ट्रेलियाच्या 47 रन्सवर 3 विकेट गेल्या होत्या. रोहितने शमी आणि बुमराहच्या आधी ओव्हर करून घेण्याचा निर्णय योग्य घेतला. मात्र, टीम इंडियाला दबाव निर्माण करता आला नाही. फिरकीपट्टू तर सपशेल फेल ठरले. मात्र, टीम इंडियाने 4 थ्या विकेट्ससाठी झटपट प्रयत्न केले नाही. स्मिथ बाद झाल्यावर रोहितने क्लोज फिल्डिंग लावलेली दिसली नाही. त्याचाच फायदा घेऊन ट्रेविस हेड आणि मार्नस लाबुशेन मैदानात चिटकले. 

पांड्याची अनुपस्थिती

आठव्या क्रमांकाचा फलंदाज पाहिजे म्हणत रोहितने समीकरणं जुळवली खरी, मात्र खऱ्या परीक्षेदरम्यान सर्व गणित बिघडलं. टीम इंडिया संकटात असताना हार्दिक पांड्या किंवा शार्दुल ठाकूर यांची अनुपस्थिती संघाला जाणवली. सिराजचा बॉल स्विंग होत नव्हता, तर बुमराह आणि शमी यांचा टप्पा बसत नव्हता. अशा संकटात मदतीला धावतो तो शार्दुल ठाकूर… त्याला देखील संधी न दिल्याने टीम इंडियाला सहाव्या गोलंदाजीची कमतरता स्पष्टपणे जाणवली.



Information Source / Image Credits

Related News

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *