World Cup 2023: ना भारत ना पाकिस्तान, आश्विन म्हणतो ‘ही’ टीम वर्ल्ड कप जिंकणार!

R Ashwin On world cup 2023: सर्वांना प्रतिक्षा लागलेल्या वर्ल्ड कपला आता फक्त दोन महिने बाकी आहेत. त्यामुळे टीम इंडियामध्ये कोणत्या खेळाडूंना संधी मिळणार? यावर सर्वांचं लक्ष लागलंय. यंदा वर्ल्ड कपचं आयोजन भारत करत असल्याने आता टीम इंडिया वर्ल्ड कप (ICC Odi World Cup 2023) जिंकणार, अशी चर्चा क्रिडा विश्वात रंगली आहे. मात्र, टीम इंडियाच्या खेळाडूलाच भारत (India Cricket Team) वर्ल्ड कप जिंकेल, यावर विश्वास नाही. भारतीय संघाचा फिरकीपटू आर आश्विन  (Ravichandran Ashwin) याने मोठं वक्तव्य केलंय.

नेमकं काय म्हणाला R Ashwin ?

एकदिवसीय विश्वचषकात ऑस्ट्रेलिया (Australia) हा एक फेव्हरेट  संघ आहे. असं आर आश्विन म्हणाला आहेत. मला माहित आहे की जगभरातील क्रिकेट लोक भारत फेव्हरेट असल्याचे सांगत असतील आणि जगभरातील सर्व क्रिकेटपटू ही रणनीती म्हणून वापरतील. भारत आधी फेव्हरिट आहे, असं म्हणत तुमच्या संघावर दबाव टाकत असतात. प्रत्येक आयसीसी इव्हेंट ते स्वतःवरील दडपण कमी करण्यासाठी आणि आमच्यावर अतिरिक्त दबाव टाकण्यासाठी ही रणनीती वापरतात, असं आश्विन म्हणतो.

भारत हा फेव्हरेटपैकी एक असू शकतो, परंतु ऑस्ट्रेलियाचा संघ देखील एक तगडा आहे, असं आश्विनने म्हटलं आहे. मला वाटते की विश्वचषकानंतर वेस्ट इंडिजवर देखील असा प्रयोग केला गेला. वेस्ट इंडिजने 1983 साली वर्ल्ड कप जिंकला. त्यानंतर भारताने त्यांची बादशाहत मोडली. त्यानंतर भारतावर वर्ल्ड कप जिंकण्याचा दबाव होता. त्यावेळी ऑस्ट्रेलियाने बाजी मारली. त्यानंतर ऑस्ट्रेलियाने क्रिकेटमध्ये आपलं वर्चस्व निर्माण केलं, असं आश्विन म्हणतो.

Related News

आणखी वाचा – World Cup 2023: वर्ल्ड कपच्या 9 सामन्यांचं शेड्यूल बदललं, आता ‘या’ तारखेला होणार IND vs PAK मॅच!

दरम्यान, आश्विनने टीम इंडियाचा युवा फलंदाज तिलक वर्मा याच्यावर विश्वास दाखवला आहे. तिलक वर्मा वर्ल्ड कपमध्ये एक्स फॅक्टर ठरू शकतो, असं आश्विन म्हणतो. तो खूप चांगला लेफ्ट हॅडर फलंदाज आहे. जडेजाशिवाय टीम इंडियामध्ये सध्या लेफ्टी फलंदाज नसल्याने त्याला संधी दिली जाऊ शकते. तो नेहमी एक चांगला पर्याय आहे, असंही आश्विनने म्हटलं आहे.



Information Source / Image Credits

Related News

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *