World Cup 2023 : नवीन-उल-हकचा ऑस्ट्रेलियावर ‘तालिबानी’ स्टाईक, मानवाधिकार की दोन गुण? इन्स्टाग्राम पोस्ट चर्चेत!

AFG vs AUS World Cup 2023 : अफगाणिस्तानच्या संघाने यंदाच्या वर्ल्ड कपमध्ये उल्लेखनिय कामगिरी केली आहे. तालिबानी व्यवस्था आणि सततचे भूकंप यामुळे अफगाणी लोकांच्या जीव टांगणीला होता. मात्र, अफगाणिस्तानच्या संघाने आपल्या सर्वोत्कृष्ट कामगिरीच्या जोरावर अफगाणी लोकांच्या चेहऱ्यावर हसू फुलवलं. कधी नव्हे ते अफगाणिस्तानने वर्ल्ड कपमध्ये 4 विजय मिळवले आहेत. त्याचबरोबर अफगाणिस्तानच्या क्रिकेट (Afghanistan Cricket) इतिहासात पहिल्यांदाच चॅम्पियन ट्रॉफीमध्ये (Champions Trophy) स्थान मिळवलं आहे. त्यामुळे अफगाणिस्तानचा प्रत्येक सामना महत्त्वाचा ठरतोय. अशातच आता अफगाणिस्तानचा स्टार बॉलर नवीन-उल-हक (Naveen-ul-Haq) याने असं काही वक्तव्य केलंय की, सध्या सोशल मीडियावर त्याचीच चर्चा होताना दिसते. नवीन-उल-हक वर्ल्ड कपनंतर निवृत्त होणार आहे. त्याने काही दिवसांपूर्वीच याची घोषणा केलीये. मात्र, आता त्याने आगामी ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या सामन्यापूर्वी (AFG vs AUS) कांगारूंना शिंगावर घेतलंय. नवीन-उल-हक याने इन्स्टाग्राम पोस्ट करून ऑस्ट्रेलियाला डिवचलंय.

काय म्हणाला Naveen-ul-Haq ?

मानवाधिकारांसाठी द्विपक्षीय मालिका खेळण्यास नकार देणारा ऑस्ट्रेलियाचा संघ वर्ल्ड कपमध्ये कोणती भूमिका घेणार? हे पाहणं महत्त्वाचं असणार आहे, असं म्हणत नवीन-उल-हकने ऑस्ट्रेलियाला डिवचलं आहे. दर्जा की मानवअधिकार? की 2 गुण? असं म्हणत नवीनने कांगारूंनी थेट शिंगावर घेतलं आहे.

Related News

ऑस्ट्रेलियाकडून तालिबानचा निषेध

ऑस्ट्रेलियला नोव्हेंबर 2021 मध्ये अफगाणिस्तानसोबत एक कसोटी सामनाही खेळायचा होता, परंतु त्याच वर्षी ऑगस्टमध्ये तालिबानने सत्ता काबीज केल्यानंतर हा सामना रद्द करण्यात आला. तर या वर्षी जानेवारी महिन्यात ऑस्ट्रेलियन क्रिकेट बोर्डाने (CA) अफगाणिस्तानविरुद्ध तीन सामन्यांची एकदिवसीय मालिका खेळण्यास नकार दिला होता. ही मालिका मार्चच्या अखेरीस यूएईमध्ये खेळवली जाणार होती.

ऑस्ट्रेलियाने नकार का दिला होता?

महिला, मुलींच्या शिक्षण आणि रोजगारावर तालिबानने निर्बंध घातले आहेत. तालिबानच्या या कृतीला विरोध दर्शवण्यासाठी क्रिकेट ऑस्ट्रेलियाने मार्चमध्ये अफगाणिस्तानविरुद्धच्या एकदिवसीय मालिकेतून माघार घेण्याचा निर्णय घेतला होता. महिला आणि मुलींच्या चांगल्या परिस्थितीच्या आशेने आम्ही अफगाणिस्तान क्रिकेट बोर्डाला पाठिंबा देत राहू, असंही ऑस्ट्रेलिया क्रिकेट बोर्डाने म्हटलं होतं.

वर्ल्ड कपसाठी दोन्ही संघ 

अफगानिस्तान : हशमतुल्लाह शाहिदी (कॅप्टन), रहमानुल्लाह गुरबाज, इब्राहिम जादरान, रियाज हसन, रहमत शाह, नजीबुल्लाह जादरान, मोहम्मद नबी, इकराम अलीखिल, अजमतुल्ला उमरजई, राशिद खान, मुजीब उर रहमान, नूर अहमद, फजलहक फारूकी, अब्दुल रहमान, नवीन उल हक.

ऑस्ट्रेलिया : पॅट कमिंस (कॅप्टन), स्टीव स्मिथ, एलेक्स कॅरी, जोश इंग्लिस, सीन एबॉट, कॅमरन ग्रीन, जॉश हेजलवुड, ट्रॅविस हेड, मार्नस लाबुशेन, मिच मार्श, ग्लेन मैक्सवेल, मार्कस स्टोइनिस, डेव्हिड वार्नर, एडम झॅम्पा, मिशेल स्टार्क.Information Source / Image Credits

Related News

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *