World Cup 2023: राहुल द्रविड यांची एक चूक आणि…; वर्ल्डकपमध्ये टीम इंडियाला पडणार भारी

World Cup 2023: सध्या ऑस्ट्रेलिया विरूद्ध भारत ( Ind vs Aus ) यांच्यात 3 सामन्यांची वनडे सिरीज खेळवण्यात येतेय. या सिरीजमधील पहिल्या सामन्यात टीम इंडियाचं ( Team India ) ऑस्ट्रेलियावर वर्चस्व दिसून आलं. मोहालीमध्ये रंगलेल्या सामन्यात टीम इंडियाने ( Team India ) 5 विकेट्सने ऑस्ट्रेलियाचा पराभव केला. दरम्यान वर्ल्डकप ( World cup ) तोंडावर असताना या सिरीजला अधिक महत्त्व दिलं जातंय. या सिरीजमध्ये टीम इंडियाचे हेड कोच राहुल द्रविड ( Rahul Dravid ) यांच्याकडून एक मोठी चूक झाली असून त्याचा परिणाम वर्ल्डकपमध्ये दिसून येण्याची शक्यता आहे. 

Rahul Dravid यांची ही चूक पडणार महागात

टीम इंडियाने ( Team India ) ऑस्ट्रेलिया सिरीजमधील पहिल्या दोन वनडे सामन्यांसाठी विराट कोहली, रोहित शर्मा तसंच हार्दिक पांड्या यांना विश्रांती देण्यात आली आहे. मात्र या खेळाडूंना दिलेला आराम महागात पडण्याची शक्यता आहे. 2023 च्या वर्ल्डकपपूर्वी खेळाडूंचा सराव खूप महत्त्वाचा आहे. 

वर्ल्डकपपूर्वी ऑस्ट्रेलिया सिरीजही आयोजित करण्यात आली. परंतु पहिल्या दोन सामन्यांमध्ये न खेळल्यामुळे रोहित आणि विराटला सराव मिळणार नाही. त्यामुळे आगामी वर्ल्डकपमधील सामन्यांत त्यांच्या कामगिरीवर परिणाम होण्याची शक्यता आहे.

Related News

वेस्टइंडिज दौऱ्यावर देखील दिलेला आराम

जुलैमध्ये वेस्ट इंडिज दौऱ्यावर झालेल्या वनडे सिरीज दरम्यान राहुल द्रविडने ( Rahul Dravid ) दुसऱ्या आणि तिसऱ्या वनडेदरम्यान रोहित शर्मा ( Rohit Sharma ) आणि विराट कोहलीला विश्रांती दिली होती. त्यामुळे वेस्ट इंडिजसारख्या टीमविरुद्ध भारताला पराभवाला सामोरं जावं लागलं होतं. दरम्यान या खेळाडूंना विश्रांती दिल्यानंतर आगामी सामन्यात निकाल काय लागतो हे पहावं लागणार आहे.

कशी आहे वर्ल्डकपसाठी टीम इंडिया

रोहित शर्मा ( कर्णधार ), हार्दिक पंड्या ( उपकर्णधार ), शुभमन गिल, विराट कोहली, श्रेयस अय्यर, केएल राहुल, रवींद्र जडेजा, अक्षर पटेल, शार्दुल ठाकूर, जसप्रीत बुमराह, मोहम्मद सिराज, मोहम्मद शमी, कुलदीप यादव, ईशान किशन, सूर्यकुमार यादव. 



Information Source / Image Credits

Related News

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *