World Cup 2023 | “टीम इंडिया वर्ल्ड कप जिंकेल पण…”, कपिल देव यांची मोठी भविष्यवाणी!

Kapil Dev On Team India : आशिया कपमध्ये (Asia Cup 2023) दणक्यात विजय मिळवल्यानंतर टीम इंडियाचं (Team India) आगामी लक्ष आता भारतात होणाऱ्या वर्ल्ड कपवर (World Cup 2023) असणार आहे. टीम इंडियाचे सर्व खेळाडू फॉर्ममध्ये असल्याने आता रोहित शर्माची चारही बोटं तुपात आहेत, असं म्हटलं तर वावगं ठरणार नाही. ओपनर्स, मिडल ऑर्डर, ऑलराऊंडर्स आणि बॉलिंग डिमार्टमेंटमध्ये देखील सुधारणा होताना दिसत आहे. त्यामुळे टीम इंडिया यंदाचा वर्ल्ड कप मारणार, अशी चर्चा होताना दिसतेय. अशातच आता 1983 चा विश्वचषक जिंकवणारे माजी कॅप्टन कपिल देव (Kapil Dev) यांनी मोठी भविष्यवाणी केली आहे.

नेमकं काय म्हणाले Kapil Dev ?

टीम इंडिया फेव्हरेट आहोत हे आत्ताच सांगू शकत नाही. आमचा संघ चांगला आहे. हृदय काही बोलेल आणि मन तेच सांगतंय, असं कपिल देव म्हणतात. आपण अव्वल चारमध्ये पोहोचलो तर ते महत्त्वाचे ठरेल आणि इथून पुन्हा नशिबाची गोष्ट आहे. मी माझा संघ ओळखतो, पण इतर संघांना ओळखत नाही, अशा परिस्थितीत उत्तर देणं चुकीचं ठरेल, असं कपिल देव म्हणाले आहेत. भारत यंदाचा विश्वचषक स्वतःच्या भूमीवर जिंकू शकतो, परंतु त्याला प्रबळ दावेदार म्हणून घोषित करणं योग्य होणार नाही कारण बरंच काही नशिबावर देखील अवलंबून असेल, असं देखील कपिल देव (Kapil Dev On Team India) म्हणतात.

मोहम्मद सिराजने मागील सामन्यात चांगली बॉलिंग केलीये. मला आनंद आहे की आपले फास्टर गोलंदाज 10 विकेट घेऊ शकतात. एक काळ असा होता की, तुम्हाला तुमच्या स्पिनर्सवर अवलंबून रहावं लागायचं. मात्र, आता टीम चांगली कामगिरी करत आहे. त्यावेळी त्यांनी शुभमन गिलचं कौतुक देखील केलं. शुभमन सारखा खेळाडू संघात असणं ही गर्वाची गोष्ट आहे, असं कपिल देव म्हणतात.

Related News

आणखी वाचा – IND vs AUS : ज्याची भीती होती तेच झालं, वर्ल्ड कपपूर्वी ऑस्ट्रेलियाला जोर का झटका!

आश्विन आणि शिखर सारख्या खेळाडूंना संघात संधी मिळाली नसल्याने अनेकजण टीका करत आहेत. मात्र, प्रत्येकाची वेगळी निवड असते. सिलेक्टर्सला आपल्यापेक्षा जास्त माहित असतं. त्यामुळे त्यांना त्यांचं काम करू द्या. बोट दाखवणं सोप्पं असतं, असं कपिल देव म्हणतात. एक क्रिकेटपटू म्हणून मला रोमांचक सामने पाहायला आवडतात, पण एक खेळाडू म्हणून मला त्यांना ३० धावांवर बाद करून सामना जिंकायला आवडेल. एक प्रेक्षक म्हणून मला रोमांचक सामने बघायचे आहेत, असं कपिल देव म्हणाले आहेत.



Information Source / Image Credits

Related News

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *