World Cup 2023: क्रिकेट प्रेमींची उत्सुकता संपणार; ‘या’ तारखेला वर्ल्डसाठी टीम इंडियाची होणार घोषणा

ICC ODI World Cup 2023: यंदाचा वनडे वर्ल्डकप ( ICC ODI World Cup 2023 ) अत्यंत खास असणार आहे, याचं कारण म्हणजे तो भारतात आयोजित केला जाणार आहे. ऑक्टोबरमध्ये सुरु होणाऱ्या या वर्ल्डकपसाठी ( ICC ODI World Cup 2023 ) काही देशांनी आपली टीम घोषित केलीये. अशातच आता टीम इंडियाची वर्ल्डकपसाठी घोषणा कधी होणार असा प्रश्न चाहत्यांकडून उपस्थित होताना दिसतोय. 

कधी होणार वर्ल्डकपसाठी टीम इंडियाची घोषणा? 

वर्ल्डकप 2023 ( ICC ODI World Cup 2023 ) साठी सर्व 10 देशांना टीमची घोषणा कधीपर्यंत करायची आहे, याबाबत आयसीसीने स्वतः माहिती दिलीये. आयसीसीने ( ICC ) आपल्या अधिकृत वेबसाईटच्या माध्यमातून याची घोषणा केलीये. आयसीसीच्या म्हणण्यानुसार, सर्व टीम्सना 28 सप्टेंबरपर्यंत वर्ल्डकपच्या फायनल स्क्वॉडची घोषणा करावी लागणार आहे. 

आयसीसीने ( ICC ) सांगितंय की, 28 तारखेपर्यंत टीम घोषित झाल्यानंतर त्यामध्ये बदल केले जाणं शक्य आहे. मात्र यासाठी आयसीसीची ( ICC ) परवानगी घेणं बंधनकारक असणार आहे. त्यामुळे अशा परिस्थितीत बीसीसीआय ( BCCI ) आशिया कपनंतर आपल्या टीमची घोषणा करणार असल्याचं म्हटलं जातंय.

Related News

वर्ल्डकपसाठी टीम इंडियाचं कसं असेल शेड्यूल?

टीम इंडिया 2023 च्या वनडे वर्ल्डकपची तयारी टीम इंडियाने ( Team India ) सुरु केली आहे. यावेळी टीम इंडियाचा पहिला सामना ऑस्ट्रेलियाविरुद्ध होणार आहे. 8 ऑक्टोबर भारत विरूद्ध ऑस्ट्रेलिया चेन्नईच्या मैदानावर एकमेकांशी भिडणार आहेत. यानंतर टीम इंडियाचा ( Team India ) दुसरा सामना अफगाणिस्तानविरुद्ध 11 ऑक्टोबरला दिल्लीमध्ये रंगणार आहे. 

सर्व क्रिकेट चाहते उत्सुक असणारा भारत आणि पाकिस्तान ( India Vs Pakistan ) हा हायव्होल्टेज सामना 15 ऑक्टोबरला होणार आहे. मात्र या सामन्याच्या तारखेत बदल होऊ शकतो. टीम इंडियाचा सामना 19 ऑक्टोबरला बांगलादेशाशी रंगणार आहे. तर 22 ऑक्टोबर रोजी टीम इंडिया न्यूझीलंडशी भिडणार असून त्यानंतर इंग्लंडविरूद्ध 29 ऑक्टोबर रोजी आमनेसामने येणार आहेत. 

यानंतर श्रीलंकेशी 2 नोव्हेंबरला सामना होणार आहे. तर 5 नोव्हेंबरला टीम इंडियाचा सामना कोलकातामध्ये दक्षिण आफ्रिकेशी होणार आहे. यामध्ये टीम इंडिया शेवटचा सामना नेदरलँड्सशी खेळणार आहे. 11 नोव्हेंबर रोजी हा सामना बंगळूरुमध्ये रंगणार आहे.



Information Source / Image Credits

Related News

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *