World Cup 2023: वर्ल्ड कपच्या 9 सामन्यांचं शेड्यूल बदललं, आता ‘या’ तारखेला होणार IND vs PAK मॅच!

ICC World Cup 2023 Schedule Changed: यंदाचा एकदिवसीय वर्ल्ड कप भारतात खेळवला जाणार आहे. विश्वचषकाचं यजमानपद भारत भूषवणार  असल्याने आता सर्वांची उत्सुकता शिगेला पोहोचली आहे. येत्या 5 ऑक्टोबरपासून वर्ल्ड कपचं रणशिंग फुंकलं जाईल. अशातच आता आयसीसीने बुधवारी वेळापत्रकात मोठ्या बदलांची माहिती दिली आहे. आंतरराष्ट्रीय क्रिकेट परिषदेने (ICC) भारत-पाकिस्तानसह 9 सामन्यांच्या वेळापत्रकात बदल करण्याचा निर्णय घेतला आहे.

भारत पाकिस्तान सामना कधी?

सर्वांना प्रतिक्षा असलेल्या भारत पाकिस्तान (IND vs PAK) सामन्यासह स्पर्धेतील इतर 8 सामन्यांच्या वेळापत्रकातही बदल करण्यात आला आहे. भारत आणि पाकिस्तान यांच्यातील सामना अहमदाबादमध्ये रविवारी 15 ऑक्टोबर रोजी होणार होता, परंतु तो एक दिवस आधी हलवण्यात आला आहे. आता हा सामना शनिवारी म्हणजेच 14 ऑक्टोबर रोजी खेळवला जाणार असल्याची अधिकृत माहिती आयसीसीने दिली आहे.

कधी कोणते सामने?

अफगाणिस्तान आणि इंग्लंड यांच्यात दिल्लीत होणाऱ्या सामन्याची तारीख 14 ऑक्टोबरऐवजी हा सामना 15 ऑक्टोबर करण्यात आली आहे. हैदराबादमध्ये श्रीलंका आणि पाकिस्तान यांच्यातील सामना आता 10 ऑक्टोबर रोजी होणार आहे. लखनऊमध्ये दक्षिण आफ्रिका आणि ऑस्ट्रेलिया यांच्यातील आता १२ ऑक्टोबरला होणार आहे. त्याचबरोबर बांगलादेश आणि न्यूझीलंड यांच्यातील सामना 14 ऑक्टोबर ऐवजी 13 ऑक्टोबर रोजी खेळवण्यात येणार आहे. हा सामना डे नाईट असेल.

बांगलादेश आणि इंग्लंड यांच्यातील धर्मशाला येथे होणारा सामना सकाळी 10:30 वाजता (स्थानिक वेळेनुसार) सुरू होईल. 12 नोव्हेंबर रोजी डबल हेडर सामना एकदिवस आधी शनिवार 11 नोव्हेंबरला हलविण्यात आले आहेत. त्यातील एक सामना पुण्यात होणार आहे. ऑस्ट्रेलिया आणि पाकिस्तान य़ांच्यातील सामना सकाळी 10:30 वाजता होईल. कोलकाता येथे इंग्लंड आणि पाकिस्तान यांच्यात दुपारी 2 वाजता सामना खेळवला जाईल. त्याचबरोबर नेदरलँड्सविरुद्ध भारताचा शेवटचा साखळी सामना आता 11 ऐवजी 12 नोव्हेंबरला खेळवला जाईल.

आणखी वाचा – सूर्या अचानक सेहवाग मोडमध्ये कसा काय आला? Suryakumar Yadav ने सांगितलं पहिल्या बॉलचं गुपित; पाहा Video

दरम्यान, पहिला उपांत्य सामना 15 नोव्हेंबरला मुंबईत तर दुसरा उपांत्य सामना 16 नोव्हेंबरला कोलकाता येथे होणार आहे. तसेच अंतिम सामन्याच्या वेळेत कोणताही बदल करण्यात आलेला नाही.

ICC Announces Rescheduled World Cup 2023 matches

October 10: England vs Bangladesh – Dharamsala – 10:30 AM

October 10: Pakistan vs Sri Lanka – Hyderabad – 2:00 PM

October 12: Australia vs South Africa – Lucknow – 2:00 PM

October 13: New Zealand vs Bangladesh – Chennai – 2:00 PM

October 14: India vs Pakistan – Ahmedabad – 2:00 PM

October 15: England vs Afghanistan – Delhi – 2:00 PM

November 11: Australia vs Bangladesh – Pune – 10:30 AM

November 11: England vs Pakistan – Kolkata – 2:00 PM

November 12: India vs Netherlands – Bengaluru – 2:00 PMInformation Source / Image Credits

Related News

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *