वर्ल्ड कप आधीच मोहम्मद शमीसाठी गुड न्यूज? बायको म्हणते, ‘मुझे देखकर जरा…’

Mohammed Shami Divorce Wife Hasin jahan: टीम इंडियाचा फास्ट बॉलर मोहम्मद शमी आणि त्याची पत्नी हसीन जहा 2018 पासून वेगळे राहतात. मोहम्मद शमीवर तिने घरगुती हिंसाचाराचा आरोप केला होता. मोहम्मद शमी वर्ल्ड कपमध्ये फॉर्मात आहे. आतापर्यंत त्याने 23 विकेट घेतल्या. न्यूझीलंडविरुद्ध उपांत्य फेरीच्या सामन्यात 7 विकेट घेत त्याने नवा विक्रम केला. विश्वचषकातील त्याची चमकदार कामगिरी पाहून त्याची पत्नी हसीन जहाँचेही हृदय विरघळल्याची चर्चा सोशल मीडियात सुरु आहे. 

शमीवर घरगुती हिंसाचार आणि मारहाणीसह अनेक गंभीर आरोप करत खटला दाखल करणाऱ्या हसीन जहाने एक व्हिडीओ शेअर केला आहे. त्यात ती हसायला सांगत आहे. हसीन जहाँने सोशल मीडिया प्लॅटफॉर्म इन्स्टाग्रामवर एक व्हिडीओ शेअर केला आहे. ज्यामध्ये ती लता मंगेशकर यांच्या ‘मुझे देखा जरा मुस्कुरा दो’ गाण्यावर लिप सिंक करताना दिसत आहे. 

हसीन जहॉने हा व्हिडीओ पोस्ट केल्यानंतर मोहम्मद शमीचे चाहते कमेंट्सवर कमेंट करत आहेत. हा व्हिडीओ शमी फॅन्समध्ये व्हायरल केला जातोय. एका यूजरने लिहिले की, ‘शमी भाई आता विरघळणार नाही, तो तुमच्यावर रागावला आहे. मला माहित आहे शमी भाई देखील तुमच्यासाठी हे गाणे गायचा, असे यूजरने म्हटले.

Related News

हसीन जहाँच्या व्हिडीओवर यूजर्सच्या प्रतिक्रिया 

आणखी एका यूजरने एक वेगळीच कमेंट केली आहे. ‘लग्नानंतर तुम्ही शमी भाईचा आदर केला नाही. आज जगभरात त्याचे कौतुक होत आहे, म्हणून तुम्ही त्याला आकर्षित करण्याचा प्रयत्न करत आहात, असे त्याने म्हटले. तर दुसऱ्या एका युजरने ‘आता तुम्ही आयुष्यभर एकटेच हसत राहा. तो आता परत येणार नाही, असे म्हणत हसीन जहॉला टोमणा मारला आहे.

हसीन जहाँ सोशल मीडियावर सक्रिय

विशेष म्हणजे हसीन जहाँ सध्या सोशल मीडियावर जास्त सक्रिय दिसत आहे. सोशल मीडियावर ती एकामागून एक व्हिडीओ अपलोड करत असते. यापूर्वी तिने ‘तेरे नाम से ही मुझको दुनियावाले जानेगे’ या गाण्यावर रिल बनवली होती. यावरही शमीच्या चाहत्यांनी हसीन जहाँला कमेंट्स करुन फटकारले होते.

‘चांगला माणूस असता तर..’

“तो जितका चांगला खेळाडू आहे तितकाच चांगला माणूसही असता तर आमचं आयुष्य फार चांगलं असतं. जर तो एक चांगली व्यक्ती असता तर माझी मुलगी, माझा पती आणि मी एक सुखी आयुष्य जगलो असतो. तो केवळ एक चांगला खेळाडू नसून एक चांगला नवरा आणि एक चांगला पिताही असता तर ती अधिक आदराची आणि सन्मानाची बाब असती,” असं हसीन जहाँ म्हणाली आहे. 
पुढे ती म्हणाली की, “पण शमीच्या चुकांमुळे, लोभामुळे आणि त्याच्या घाणेरड्या मनामुळे आम्हा तिघांना त्याचे परिणाम भोगावे लागत आहे. मात्र, तो पैशाच्या माध्यमातून आपली नकारात्मक बाजू लपवण्याचा प्रयत्न करत आहे”. Information Source / Image Credits

Related News

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *