सप्तशृंगी देवीच्या चरणी जगातील सर्वात कमी उंची असलेली महिला झाली नतमस्तक | महातंत्र
सप्तशृंग गड, महातंत्र वृत्तसेवा :  श्री क्षेत्र सप्तशृंगी देवी ही आद्य शक्तीपीठ म्हणून व पर्यटन स्थळ म्हणून ओळखले जाते. त्या ठिकाणी देवीच्या चरणी मोठ्या प्रमाणात विविध सेलिब्रिटी गडावरती दर्शनासाठी येत असतात. आज जगातील सर्वात कमी उंचीची महिला असलेले ज्योती अमागे ही सप्तशृंगी चरणी आज नसतं मस्तक झाली. ज्योतीचा जन्म जन्म १६ डिसेंबर १९९३ रोजी किशनजी आणि रंजना आमगे यांच्या पोटी नागपूर येथे झाला. ज्योतीची पूर्ण उंची ६२.८ सेंटीमीटर (म्हणजे दोन फुटापेक्षा किंचित जास्त) इतकी आहे. त्यांची उंची कमी असण्यामागे अकॉड्रोप्‍लासिया नावाचा आजार कारणीभूत आहे. ही उंची चार महिन्याच्या बाळा इतकी आहे असे मानले जाते.

१६ डिसेंबर २०११ रोजी आमगेच्या १८ व्या वाढदिवशी, त्यांना अधिकृतपणे गिनेस बुक ऑफ वर्ल्ड रेकॉर्डद्वारे ६२.८ सेंटीमीटर (२फूट ३/४इंच) उंचीसह जगातील हयात असलेली सर्वात लहान महिला म्हणून घोषित करण्यात आले. गिनिज बुकसाठी ज्योतीची उंची मोजताना
इ.स. २०१२ मध्ये, त्या नेपाळच्या चंद्र बहादूर डांगी या जगातील सर्वात लहान माणसाला भेटल्या. गिनेज बुक ऑफ वर्ल्ड रेकॉर्डच्या ५७ व्या आवृत्तीसाठी या जोडीने एकत्र पोझ दिली होती.

लोणावळा येथील सेलिब्रिटी वॅक्स म्युझियम मध्ये आमगे यांचा मेणाचा पुतळा उभारण्यात आला आहे. लोणावळा येथील ज्योती आमगेचा मेणाचा पुतळा आहे. यावेळेस यावेळी देवी चरणी नतमस्तक होऊन देवीचा आशीर्वाद घेतला पुढील वर्षी पुन्हा आई सप्तशृंगीच्या दर्शनासाठी गडावरती येईन, अशी भावना तिने व्यक्त केली. यावेळेस मयूर जोशी गणेश बर्डे आधीच सामाजिक कार्यकर्ते उपस्थित होते.

हेही वाचलंत का?

Information Source / Image Credits

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *