यशस्वी जयस्वालची Success Story खोटी? खरंच विकायचा पाणी-पुरी?

Yashasvi Jaiswal : आयपीएलमध्ये ( IPL ) चमकल्यानंतर युवा खेळाडू यशस्वी जयस्वाल ( Yashasvi Jaiswal ) ने टीम इंडियाने डेब्यू केलं. वेस्ट इंडिजविरूद्धच्या टेस्ट सिरीजमध्ये यशस्वीचा प्लेईंग 11 मध्ये समावेश करण्यात आला होता. डेब्यू सामन्यातच शतक ठोकत त्याने आपलं नाणं खणखणीत वाजवलंय. पहिल्या सामन्यात त्याने 171 रन्सची खेळी केली. दरम्यान गेल्या काही दिवसांपासून त्याची संघर्षमय कहाणी व्हायरल होतेय. यामध्ये जयस्वाल सुरुवातीच्या काळात पाणीपुरी विकत असल्याचा दावा करण्यात आला होता. मात्र त्याची ही कहाणी फेक ( Yashasvi Jaiswal Success story Fake ) असल्याचं आता समोर आलंय. 

सोशल मीडियावर व्हायरल झालेल्या कहाणीनुसार, यशस्वी जयस्वाल ( Success story ) त्याच्या करियरच्या सुरुवातीच्या काळात पाणीपुरी विकत होती. पण या व्हायरल होत असलेल्या कहाणीमध्ये किती सत्य आहे? या प्रश्नाचे उत्तर यशस्वी जयस्वालच्या ( Yashasvi Jaiswal ) प्रशिक्षक ज्वाला सिंग यांनी दिले आहे.

खरंच पाणी-पुरी विकायचा यशस्वी?

यशस्वी जयस्वालचे ( Yashasvi Jaiswal ) कोच ज्वाला सिंग यांनी सांगितलं की, पाणीपुरी विकण्याच्या कहाणीचा सत्याशी काहीही संबंध नाही. ही एक पूर्णपणे बनवलेली कहाणी आहे. आणि या कहाणीचा सत्याशी काडीमात्र संबंध नाही. 

Related News

यशस्वीचे कोच ज्वाला यांनी जयस्वालच्या ( Success story ) पाणीपुरी विकण्याच्या कथेला बकवास म्हटलंय. यशस्वी जयस्वालच्या प्रशिक्षक ज्वाला सिंग म्हणतात की, पाणीपुरी विकण्याची कहाणी ऐकल्याने मी खूप निराश झालो. कारण ती पूर्णपणे बनावट आहे. लोकांनी अशा कहाणी व्हायरल करणं पसरवलं पाहिजे. 

पाणीपुरी विकतानाच्या फोटाबाबत काय म्हणाले कोच?

ज्वाला सिंह पुढे म्हणाले, यशस्वी जयस्वाल ( Yashasvi Jaiswal ) हा पाणीपुरी विकणारा प्रोफेशनल व्यक्ती नव्हता. जयस्वालने आझाद मैदानाजवळ अनेक वेळा पाणीपुरी विकणाऱ्या विक्रेत्याला मदत केलीये. यशस्वी जयस्वालच्या ( Yashasvi Jaiswal ) फोटोचा गैरवापर केलाय. 

सोशल मीडियावर काय कहाणी व्हायरल?

सोशल मीडियावर व्हायरल ( Social Media Viral ) झालेल्या कहाणीनुसार, यशस्वी जयस्वालचे वडील पाणीपुरी विकायचे. यावेळी जयस्वाल ( Yashasvi Jaiswal ) देखील पाणीपुरी विकण्यात वडिलांना मदत करत होता. परंतु आता त्याच्या कोचच्या म्हणण्याप्रमाणे, पण ही केवळ अफवा आहे. या गोष्टींचा सत्याशी काहीही संबंध नाही.



Information Source / Image Credits

Related News

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *