दुहेरी हत्याकांडाने यवतमाळ हादरले; सज्जनगड मठात आढळले दोन मृतदेह, गूढ कायम

श्रीकांत राऊत, झी मीडिया

Yavatmal Crime News: यवतमाळमध्ये (Yavatmal) दुहेरी खुनाची घटना उघडकीस आली आहे. यवतमाळच्या खानगाव शिवारातील सज्जनगड मठाचे (Sajjangad Math) प्रमुख लक्ष्मण शेंडे उर्फ चरणदास महाराज आणि त्यांच्या सेवेकरी पुष्पा होले यांचे मृतदेह मठात आढळले आहेत. या घटनेमुळं परिसरात एकच खळबळ उडाली आहे. पोलीस या प्रकरणी अधिक तपास करत आहेत.  (Yavatmal Crime News Today)

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, ते वास्तव्यास असलेल्या घरातील साहित्य अस्ताव्यस्त स्थितीत आढळले होते. तसंच, दोघांच्या मृतदेहावर कोणत्याही मारहाणीच्या खुणा आढळल्या नसल्याने या प्रकरणाचे गुढ अधिक वाढले आहे. तसंच, संशयास्पद स्थितीत मृतदेह आढळल्याने पोलिसही चक्रावले आहेत. 

Related News

गेल्या कित्येक वर्षांपासून दोघेही मठात वास्तव्यास होते. चरणदास महाराज हे जडीबुटी देऊन आजारी व्यक्तींवर उपचार करत होते. त्यांच्या उपचारांमुळं अनेकांना गुण आल्याचे सांगण्यात येते. त्यामुळं त्यांच्यावर विश्वास ठेवणारे आणि त्यांना मानणारे अनेक जण होते. त्यामुळं त्यांच्या मृत्यूने एकच खळबळ उडाली आहे. 

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, चरणदास महाराज आणि सेवेकरी पुष्पा होले यांच्याकडील रोख व दागिने चोरीच्या दृष्टीने ही हत्या केली असावी, असा संशय पोलिसांना आहे. पोलिसांकडून घटनास्थळाचा पंचनामा करण्यात येत आहे. श्वान पथक, ठसेतज्ज्ञ आदींना पाचारण करुन तपास करण्यात येत आहे.

कल्याणमध्ये संतापजनक प्रकार

कल्याणमध्ये राहणाऱ्या भावा-बहिणींनी मिळून एका अल्पवयीन मुलीसोबत विकृत प्रकार केला आहे. घराशेजारी राहणारी 12 वर्षीय मुलगी घरासमोरील अंगणात खेळत असताना तिला जवळ बोलवून एका तरुणाने तिच्यासोबत अश्लील चाळे केले. भावा- बहिणीने दोघांनी मिळून परिसरात राहणाऱ्या बारा वर्षीय अल्पवयीन मुलीसोबत अश्लील चाळे केल्याचे उघड झाले आहे. धक्कादायक म्हणजे, भाऊ पीडित मुलीसोबत अश्लील चाळे करत असतानाच ही विकृत घटना बहिण मोबाईलमध्ये चित्रीत करत होती. भावाच्या या विकृत घटनेचा व्हिडिओ तिने बनवला होता. 



Information Source / Image Credits

Related News

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *