होय, पक्षात फूट पडली नाही, पण अध्यक्ष बदललाय!: जयंत पाटलांच्या NCPच्या सुनावणीवरील विधानास छगन भुजबळांचे प्रत्युत्तर

मुंबईएका तासापूर्वी

  • कॉपी लिंक

राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये फूट पडून दोन महिन्यांपेक्षा अधिकचा कालावधी झाला आहे. मोजके नेते सोडले तर कोणता आमदार कोणत्या गटात आहे, याचं चित्र अद्याप स्पष्ट झालं नाही. राजकीय नेत्यांसह लोकांमध्येही याबाबत संभ्रम आहे. पक्षात कोणतीही फूट पडली नाही, असा दावा दोन्ही गटांकडून केला जात आहे. अशी एकंदरीत स्थिती असताना निवडणूक आयोगानं राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये फूट पडल्याचं मान्य केलं आहे. तसेच दोन्ही गटांना 6 ऑक्टोबर रोजी सुनावणीसाठी बोलावलं आहे.

यानंतर राष्ट्रवादी काँग्रेसचे (शरद पवार गट) प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी निवडणूक आयोगावर गंभीर आरोप केला आहे. पक्षात कसलीही फूट पडली नाही, असं शरद पवारांनी सांगितलं असताना, निवडणूक आयोगाने 6 ऑक्टोबर रोजी पक्षफुटीवर सुनावणी ठेवली आहे, असा आरोप जयंत पाटलांनी केला. जयंत पाटलांच्या या विधानावर अजित पवार गटाचे आमदार छगन भुजबळ यांनी प्रतिक्रिया दिली.

छगन भुजबळ म्हणाले, पक्षात फूट पडली नाही, आम्ही केवळ अध्यक्ष बदलला आहे, असे विधान त्यांनी केले. भुजबळ म्हणतात, चांगली गोष्ट आहे. आम्हीही म्हणतो आमच्या पक्षात फूट पडली नाही. आम्ही फक्त अध्यक्ष बदलले आहेत. काही लोक बदलले आहेत. वेगवेगळे पदाधिकारी बदलले आहेत. जसे की अजित पवार हे आता राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष झाले आहेत. याबाबत निवडणूक आयोगाला आम्ही आधीच कळवलेले आहे.

महाराष्ट्राच्या राजकारणातील अन्य बातम्या वाचा…

पक्षात फूट नसल्याचे सांगूनही सुनावणी लावली! जयंत पाटलांचा निवडणूक आयोगावर गंभीर आरोप

राष्ट्रवादी काँग्रेसचे (शरद पवार गट) प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी केंद्रीय निवडणूक आयोगावर गंभीर आरोप केला आहे. राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये कसलीही फूट पडली नाही, असं शरद पवारांनी निवडणूक आयोगाला सांगितलं होतं, तरीही निवडणूक आयोगानं पक्षफुटीसंदर्भात सुनावणीची तारीख दिली आहे, असा गंभीर आरोप जयंत पाटलांनी केला. ते प्रसारमाध्यमांशी बोलत होते. – क्लिक करा येथे, वाचा संपूर्ण बातमी

Information Source / Image Credits

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *