जळगावएका तासापूर्वी
- कॉपी लिंक
जळगाव येथील इच्छादेवी चौकात जळगाव शहर व जिल्हा ग्रामीण युवक काँग्रेसच्यावतीने जिल्हाध्यक्ष देवेंद्र मराठे यांच्या नेतृत्वात नरेंद्र मोदी यांचा जन्मदिवस पकोडे तळून राष्ट्रीय बेरोजगार दिवस म्हणून साजरा करण्यात आला. मोदी सरकारने आश्वासने देऊन युवकांची दिशाभूल केली आहे. नोकऱ्या तर मिळाल्या नाहीत. देशात बेरोजगारी वाढत आहे. मोदी प्रत्येक वेळेस नवीन भूलथापा देऊन जनतेची भालामन करण्याचा प्रयत्न करीत आहेत. आता जनता भाजप सरकारला 2024 मध्ये पकोडे तळायला नक्की पाठवेल,असा आरोप युवक काँग्रेस जिल्हाध्यक्ष मराठे यांनी केला.
पदवीधर युवकांना बेरोजगार करण्याच्या निषेधार्थ युवक काँग्रेसच्या वतीने मोदी सरकारच्या विरोधात घोषणाबाजी केली. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा निषेध व्यक्त करण्यात आला. सन 2014 मध्ये मोदी यांनी देशातील युवकांना दरवर्षी दोन करोड नोकऱ्या देण्याचं खोटं आश्वासन दिले. मोदी सरकारला नऊ वर्ष पूर्ण होत आहेत. परंतु अद्याप देशातील कुठल्याही युवकाला मोदी सरकार रोजगार देऊ शकले नाही.
त्यामुळे भारतीय राष्ट्रीय युवक काँग्रेसचे अध्यक्ष सन्माननीय बी व्ही श्रीनिवास यांच्या सुचनेनुसार देशामध्ये हा दिवस साजरा करण्यात आला. जिल्ह्यामध्ये प्रत्येक विधानसभा क्षेत्रामध्ये आज युवक काँग्रेसच्या वतीने पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा जन्मदिवस हा राष्ट्रीय बेरोजगार दिवस म्हणून साजरा करण्यात आला. युवक काँग्रेसने मोदी यांच्याविरुद्ध जोरदार घोषणाबाजी केली. जिल्हास्तरावर शहरातील इच्छादेवी चौकात देखील मोठ्या संख्येने युवा पदाधिकाऱ्यांच्या उपस्थितीत पकोडा तळून आंदोलन करण्यात आले.
यावेळी युवक काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष देवेंद्र मराठे, शहराध्यक्ष मुजीब पटेल, अल्पसंख्यांक जिल्हा उपाध्यक्ष जाकिर बागवान, तेनु सोनार, आशिष पाटील, नयन कोळी, निलेश पाटील, वसीम बापू, जमील शेख, टिपू बागवान, इसा व्यापारी, विजय चौधरी, राजू पाटील, भगवान सिंग पाटील, लोकमान शेख, ईबा बागवान आदी पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.