Zika virus : कोल्हापुरात झिका व्हायरसचे तीन रूग्ण; एका डाॅक्टरचा समावेश | महातंत्र








मुंबई; महातंत्र वृत्तसेवा : कोल्हापूर जिल्ह्यातील इचलकरंजी येथे झिका व्हायरसचे (Zika virus) तीन रूग्ण सापडले असून त्या तीन रूग्णांपैकी एक व्यवसायाने डाॅक्टर आहेत. दोन रुग्णांना अलायन्स रूग्णालयात दाखल करण्यात आले आहे.

ऑगस्ट महिन्यात मुंबईतील चेंबूरमध्ये एक रूग्ण आढळला होता. त्यानंतर आता हे तीन रूग्ण आढळले आहेत. कोल्हापूर जिल्ह्यामध्ये इचलकरंजी प्राथमिक आरोग्य केंद्र तांबेमाळ येथे (दि. १ सप्टेंबर) रोजी झिका व्हायरस या विषाणुचा एक रुग्ण आढळून आला आहे. तर २ सप्टेंबर रोजी दोन रूग्णांचे अहवाल पॉझिटीव्ह आले आहेत अशी माहिती जिल्हा साथरोग कक्षाने दिली आहे. या ३ रुग्णांचे रक्तजल नमुने पुणे येथील एनआयव्हीकडे खासगी प्रयोशाळेमार्फत पाठविण्यात आले असून अद्याप अहवाल अप्राप्त आहे.

झिका व्हायरसचे कोल्हापुरात सापडलेले रुग्ण

पहिला रुग्ण हे ३८ वर्षीय पुरूष असून न्युरोफिजिशियन आहेत. स्वतःचे क्लिनिक असून इतर गावास भेट देवुन उपचार देत असतात. दि. २४ ऑगस्ट रोजी रत्नागिरी येथील डॉ पारकर हॉस्पिटल रुग्ण तपासणीसाठी गेले होते.त्यावेळी गणपतीपुळे येथे भेट दिली होती. तेथील पार्किंगच्या ठिकाणी डासांचा प्रार्दुभाव असल्याचे त्यांनी सांगितले. दि २५ ऑगस्ट रोजी ताप, सर्दी, सर्दी जाणवू लागली. त्यानंतर दि.२९ ऑगस्ट रोजी अंबिका प्रयोगशाळेमध्ये रक्तजल नमुना तपासणीसाठी दिला.

दुसरा रूग्ण या झेंडा चौक येथील महिला आहे तर तिसरा रूग्ण कागवडे मळा येथील पुरूष आहे. या दोन्ही रूग्णांना अलायन्स रूग्णालयात दाखल करण्यात आले आहे.

या पॉझिटीव्ह रुग्णांच्या घरी ६ व्यक्ती रहात आहेत त्यापैकी ३ जणांचे रक्तजल नमुने तपासणी करिता घेतले आहेत. तसेच इचलकरंजी काडापुरे तळ शेळके भवनजवळ भागामध्ये सर्वेक्षणादरम्यान ७ जणांचे रक्तजल नमुने तपासणीकरिता घेतले आहेत. यामध्ये १ गरोदर महिला आणि विनालक्षण असलेले ६ व्यक्ती आहेत.









Information Source / Image Credits

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *